फक्त पांढरा कुर्ता अन् माधुरीचा डान्स, गाणं इतकं सुंदर की एकदा नाही तर 100 वेळा ऐकाल

5 मिनिट 18 सेकंदाचं सर्वात सुपरहिट गाणं, ज्यामध्ये माधुरी दीक्षितने पांढर्‍या रंगाचा कुर्ता परिधान करून केलेला डान्स. आजही लोक पुन्हा -पुन्हा ऐकतात ते गाणं.

फक्त पांढरा कुर्ता अन् माधुरीचा डान्स, गाणं इतकं सुंदर की एकदा नाही तर 100 वेळा ऐकाल
| Updated on: May 02, 2026 | 4:13 PM

1990 च्या दशकात केबल टीव्ही प्रत्येक घरात पोहोचत होती आणि म्युझिकल काउंटडाउन शोजची क्रेझ शिगेला गेली होती. त्या काळात एखादं गाणं हिट झालं की ते थेट लोकांच्या हृदयात घर करत असे. अशाच एका गाण्याने 1995 साली सिनेमागृहांमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला होता. गाणं सुरू होताच प्रेक्षक खुर्च्यांवरून उभे राहून शिट्ट्या वाजवत, टाळ्यांचा कडकडाट करत असत. हे गाणं होतं ‘नजरे मिलीं दिल धड़का…’.

राजा या चित्रपटातील या गाण्यात माधुरी दीक्षित आणि संजय कपूर यांची जोडी दिसली होती. सुमारे 5 मिनिटे 18 सेकंद लांबीच्या या गाण्याने त्या काळात लोकप्रियतेचे नवे विक्रम प्रस्थापित केले. विशेष म्हणजे, या गाण्यात ना भव्य सेट होता, ना चमचमीत कपडे, ना मोठा बॅकग्राउंड डान्सर्सचा ताफा. फक्त एका सैल, पांढऱ्या कुर्त्यात माधुरी दीक्षितने असा डान्स केला की संपूर्ण देश तिच्या प्रेमात पडला.

त्या काळात माधुरी दीक्षित आपल्या करिअरच्या शिखरावर होती. तेजाब, राम लखन यांसारख्या चित्रपटांनंतर ती प्रत्येक दिग्दर्शकाची पहिली पसंती बनली होती. पण ‘नजरे मिलीं दिल धड़का’ या गाण्याने तिची ‘डान्सिंग क्वीन’ ही ओळख आणखी भक्कम केली.

गाणं ठरलेलं सुपरहिट

मात्र, या सुपरहिट गाण्याबाबत एक धक्कादायक गोष्ट पुढे आली. या गाण्याची धून पूर्णपणे मौलिक नव्हती. ती 1961 मधील हॉलिवूड चित्रपट Come September च्या टायटल म्युझिक आणि बॅकग्राउंड स्कोरवरून प्रेरित असल्याचं समोर आलं. त्या काळात बॉलिवूडमध्ये विदेशी धून घेऊन त्यांना भारतीय शैलीत सादर करण्याची पद्धत सर्वसाधारण होती. कॉपीराइटचे नियमही आजइतके कडक नव्हते.

खरं तर, बॉलिवूडमध्ये अशा ‘इन्स्पायर्ड’ गाण्यांची परंपरा जुनी आहे. मोहरा मधील “तू चीज बड़ी है मस्त मस्त”, शोलेमधील “मेहबूबा मेहबूबा”, आशिकी मधील “धीरे-धीरे से मेरी जिंदगी में आना” यांसारखी अनेक गाणी विदेशी धूनवर आधारित असल्याची चर्चा झाली आहे. तरीही, नजरे मिलीं दिल धड़का या गाण्याचं वेगळेपण टिकून राहिलं.

कारण, या गाण्यातील भारतीय टच आणि माधुरी दीक्षितचा अप्रतिम परफॉर्मन्स यामुळे ते पूर्णपणे ‘ओरिजिनल’ वाटतं. तिचा साधा, ओव्हरसाइज कुर्ता त्या काळात फॅशन ट्रेंड बनला होता. गाण्यामधील तिच्या एक्सप्रेशन्स आणि एनर्जीने प्रेक्षकांना भुरळ घातली.

Follow Us