AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इतर राज्यात रविवारच्या Neet परीक्षेसाठी स्पेशल बसेस, मुंबईत बेस्ट संपावर अद्यापही तोडगा नाही…

उद्या रविवार २१ जून रोजी असलेल्या नीट परीक्षेच्या निमित्ताने एकीकडे रेल्वेने रविवारचा मेगाब्लॉक रद्द केला आहे. मात्र, सेकंड जीवन वाहिनी असलेल्या बेस्टचा संप मात्र न मिटल्याने विद्यार्थ्यांचे हाल होणार असल्याचे म्हटले जाते.

इतर राज्यात रविवारच्या Neet परीक्षेसाठी स्पेशल बसेस, मुंबईत बेस्ट संपावर अद्यापही तोडगा नाही...
best bus strike and neet exam 2026
| Updated on: Jun 20, 2026 | 5:42 PM
Share

एकीकडे उद्या रविवारी होणाऱ्या Neet परीक्षेसाठी जय्यद तयारी सुरु आहे. अन्य राज्यात नीट परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशल बसेसचे आयोजन केले जात आहे. आणि मुंबईची सेंकड लाईफ लाईन म्हटल्या जाणाऱ्या बेस्टच्या गुरुवारी रात्रीापासून सुरु झालेल्या बेस्ट संपावर अद्यापही तोडगा निघालेला नसल्याचे विदारक चित्र आहे. मुंबईत शनिवारी दुसऱ्या दिवशी देखील बेस्टचा संप मिठलेला नाही. बेस्टच्या आजी आणि माजी कर्मचाऱ्यांच्या १२ संघटनांनी मिळून दोन दिवसांपासून मुंबईला वेठीस धरले आहे. या प्रकरणात काल राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्याचे मुख्य सचिव असीम गुप्ता आणि बेस्टच्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी यांची बैठक घेऊनही संपावर तोडगा न निघाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

मुंबईत गुरुवारी रात्री १२ वाजल्यापासून संप सुरु आहे. या संपावर दोन दिवस झाले तरी तोडगा न निघाल्याने मुंबईकरांना अक्षरश: वेठीस धरण्याचा प्रकार सुरु झाला आहे. बेस्ट कर्मचारी संघर्ष समितीने हा संप सुरु केला असून त्यांची मागणी निवृत्त बेस्ट कर्मचाऱ्यांची थकलेली ग्रॅज्युईटीची देणी द्यावी आणि बेस्टचे मुंबई महानगर पालिका बजेटमध्ये विलीनीकरण करण्याची आहे. बेस्टच्या संपामुळे रविवारी होणाऱ्या नीट परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना मन:स्तापाला सामोरे जावे लागणार आहे. एकीकडे इतर राज्यात नीट परीक्षेसाठी विशेष बसेसची सोय करण्यात आली आहे. तर दुसरीकडे मुंबईत बेस्टच्या संपावर तोडगा न निघाल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

रेल्वेचा रविवारचा मेगाब्लॉक रद्द

बेस्टच्या संपावर तोडगा निघाला नसला तरी मुंबईची लाईफ लाईन रेल्वेने नीट परीक्षेमुळे रविवारचा मेगाब्लॉक रद्द केला आहे. पश्चिम रेल्वेने रविवारचा मेगाब्लॉक रद्द केल्याचे जाहीर केले आहे. हा एक त्यातल्या तात दिलासा म्हटला जात आहे. बेस्टच्या संपावर तोडगा काढण्यासाठी काल परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बैठक घेतली. त्यात त्यांनी अतिरिक्त मुख्य सचिव असीम गुप्ता आणि बेस्ट महाव्यवस्थापक सोनिया सेठी यांची बैठक घेतली. तरीही संपावर तोडगा निघाला नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. बेस्टमधील १२ संघटनांनी संप केलेला आहे. या संपामुळे मुंबईचे जनजीवन या भयंकर उकाड्यात स्वस्तातील प्रवासी साधन नसल्याने विस्कळीत झाले आहे.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं