माधुरी दीक्षितच्या दोन्ही मुलांनी आजपर्यंत एकही…. अभिनेत्राचा धक्कादायक खुलासा

बॉलिवूडची धक-धक गर्ल माधुरी दीक्षितचे कोट्यवधी चाहते आहेत. प्रत्येकाने तिचे 10-15 चित्रपट तरी मोठ्या पडद्यावर पाहिले असतीलच ना.. पण तिने नुकताच तिच्या मुलांबद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे. काय म्हणाली माधुरी दीक्षित.. ? तिच्या विधानाची सर्वत्र चर्चा...

माधुरी दीक्षितच्या दोन्ही मुलांनी आजपर्यंत एकही.... अभिनेत्राचा धक्कादायक खुलासा
माधुरी दीक्षित
Image Credit source: social media
| Updated on: Dec 05, 2024 | 10:14 AM

भूलभुलैया 3 हा चित्रपट मोठ्या पडद्यावर धूमाकूळ माजवत असून कार्तिक आर्यन, विद्या बान, तृप्ती डिमरी, आणि माधुरी दीक्षित यांची या चित्रपटात प्रमुख भूमिका आहे. प्रेक्षकांनाही हा चित्रपट प्रचंड आवडला असून त्याला मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या चित्रपटात आपल्या अनोख्या अंदाजाने वावरलेली अभिनेत्री माधुरी दीक्षित हिच कामंही लोकांना खूप आवडलं. या वयातगी तिने उत्तम नृत्य सादर करत तिच्या अभिनयाचंनाणंही खणखणीत वाजवलं. त्यामुळे चित्रपट एका नव्या उंचीवर पोहोचला आहे. तिचे कोट्यवधी चाहते आहेत. अनेकांनी तिचा एक चित्रपट कित्येक वेळा थिएटरमध्ये जाऊन पाहिला असेल. पण माधुरीने नुकताच तिच्या घरच्यांबद्दल असा एक खुलासा केला जो ऐकून सगळेच थक्क झाले.

खरंतर, तिची दोन्ही मुले रायन आणि अरिन यांनी आजपर्यंत तिचा कोणताही चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहिलेला नव्हता . पण भूल भुलैया 3 हा तिचा चित्रपट त्यांनी पहिल्यांदा बघितल्यानंतर मुलांनी कशी प्रतिक्रिया दिली तेही माधुरीने सांगितलं. काय म्हणाली माधुरीची मुलं… ? चला जाणून घेऊया.

माधुरीला भूताच्या रुपात पाहून अशी होती मुलांची प्रतिक्रिया

माधुरी दीक्षितने अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, तिची दोन मुले रायन आणि अरिन यांनी आजपर्यंत तिचा एकही चित्रपट पाहिलेला नाही. पण तो त्याच्या मित्रांसोबत अमेरिकेला गेला आणि माझा ‘भूल भुलैया 3’ हा चित्रपट पहिल्यांदा पाहिला. त्यातलं माझं काम त्यांना आवडला. भूताच्या रुपातली माझं काम त्यांना आवडलं. माधुरी दीक्षितची दोन्ही मुलं अमेरिकेत शिकत आहेत आणि त्यांना लाइमलाइटपासून दूर राहायला आवडते.

पाकिस्तानमध्येही तगड फॅन फॉलोईंग

माधुरी दीक्षितच्या मुलेांनी भलेही तिचे चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहिले नसले तरी एक काळ असा होता जेव्हा तिच्या चित्रपटांची जादू इतकी जबरदस्त होती की केवळ भारतातीलच नाही तर पाकिस्तानचे लोकही त्यांच्या प्रेमात पडले.
खरंतर कारगिलमध्ये युद्ध सुरू झाले तेव्हा एका पाकिस्तानी नागरिकाने असं म्हटलं होत की, माधुरी दीक्षित दिल्यास आम्ही काश्मीर सोडू. हे वक्तव्य खूप चर्चेत आलं होतं.

1984 मध्ये राजश्री प्रोडक्शनच्या ‘अबोध’ या चित्रपटातून माधुरी दीक्षितने करिअरची सुरुवात केली होती, मात्र तिचा पहिला चित्रपट तितकासा यशस्वी ठरला नाही. पण ‘तेजाब’ चित्रपटानंतर तिचे नशीब असे बदलले की तिने कधीच मागे वळून पाहिले नाही आणि पुन्हा अभिनयाकडे वळली. तिने राम लखन, प्रेम ग्रंथ, हम आपके है कौन, हम तुम्हारे हैं सनम, ये रास्ते हैं प्यार के, दिल तो पागल है, बेटा, दिल, राजा, खलनायक, देवदास, आजा नचले यांसारख्या अनेक हिट चित्रपट दिले.