
बॉलिवूडमध्ये असे बरेच सीन असतात ज्यामुळे कलाकार फार अस्वस्थ होतात. विशेषत: अभिनेत्रींसाठी काही सीन हे करण्यासाठी अस्वस्थता जाणवते. जर तो इंटिमेट सीन असेल किंवा रोमँटीक सीन असेल तर बऱ्याचदा अभिनेत्रींना अवघडल्यासारखं होतं. असं जवळपास बऱ्याच अभिनेत्रींसोबत घडलेलं असतं. बऱ्याचदी अभिनेत्री त्यांचा हा अनुभव मुलाखतींमध्येही सांगताना दिसतात. अशीच एक अभिनेत्री म्हणजे . बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षित जिला एका सीन दरम्यान फार वाईट अनुभव आला होता.
माधुरी दीक्षित तो सीन शूट करताना घाबरली होती
माधुरी दीक्षितला एका चित्रपटात खलनायकासोबत रेप सीन शूट करायचा होता. त्यावेळी तिची फार वाईट अवस्था झाली होती. ज्यामुळे ती खूप दुःखी झाली. ती खूप घाबरली होती अन् रडूही लागली होती. हा चित्रपट होता 1989 मध्ये आलेल्या ‘प्रेम प्रतिज्ञा’. चित्रपटातील एका दृश्यात खलनायकाची भूमिका साकारणारे अभिनेता रणजीत यांच्यासोबत माधुरीला रेप सीन किंवा एक प्रकारचा इंटिमेट सीन शूट करायचा होता. या सीनवेळी माधुरी खूप घाबरली होती, इतकी की ती सेटवर रडायला लागली. ती फार पॅनिक झाली होती. हा किस्सा अभिनेते रणजीत यांनीच एका मुलाखतीत सांगितला आहे.
या खलनायकासोबत करायचा होता रेप सीन
रणजीतने स्वतः ही कहाणी सांगितली आणि सांगितले की नंतर त्याने तो सीन खूप सहजतेने शूट केला. रणजीत यांनी 500 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे आणि बहुतेक चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली आहे. बॉलिवूडमध्ये त्याची एक वेगळी ओळख आहे. हा किस्सा सांगताना रणजीत यांनी सांगितलं की शूटिंगपूर्वी माधुरी खूप घाबरली होती. त्यानंतर रणजीत स्वतः गेले आणि तिला समजावले. नंतर माधुरी रडू लागली. रणजीत म्हणाले, ” मी स्वतः गेलो आणि तिला समजावलं. तिला मी म्हटलं की मी एक चांगला माणूस आहे. तू घाबरू नको”
नंतर मात्र माधुरीचे सेटवर कौतुक झालं
रणजीत यांनी समजवल्यावर माधुरी या सीनसाठी तयार झाली. तसेच तो सीनही दोघांनी तुलनेने सहजतेने सादर केल्याचं म्हटलं जातं तसेच माधुरीचे या सीनसाठी सेटवर कौतुकही झाले. सेटवर दोघांसाठीही खूप टाळ्या वाजल्या.