खलनायक रणजीत यांची लेक पाहिली का? अभिनेत्रीपेक्षा कमी नाही; बॉलिवूड नाही तर या क्षेत्रात कमावतेय नाव
प्रसिद्ध खलनायकाची लेक बॉलिवूडमध्ये पाऊल न ठेवता ती स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत आहे. या खलनायकाने आजपर्यंत 200 हून अधिक चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारली आहे. इतर स्टारकिड्स प्रमाणे त्यांच्या मुलीने मात्र बॉलिवूड न निवडता एका वेगळ्या क्षेत्रात नाव कमावत आहे.

असे अनेक खलनायक आहेत ज्यांच्या नावानेच प्रेक्षकांच्या मानात एक भीती निर्माण होते. पण आपण पाहिलं तर आतापेक्षाही ऐंशी आणि नव्वदच्या दशकातील खलनायकांची भूमिका आणि त्यांची नावे आजही प्रेक्षकांच्या मानत आहेत. या दशकातील खलनायकांची प्रत्येकाची एक वेगळी शैली होती. त्यापैकी एक म्हणजे रणजीत. 80, 90 च्या दशकातील सर्वात क्रूर आणि धोकादायक खलनायकांपैकी एक.
रणजीतने असंख्य चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिका साकारल्या आहेत ज्या अजूनही प्रेक्षकांच्या मनात आहेत. ते हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांच्या अनोख्या विनोदी शैलीसाठी देखील ओळखले जातात. या खलनायाकांपैकी अनेकांची मुले देखील इंडस्ट्रीमध्ये नाव कमावत आहेत. मात्र रणजीत यांची मुलगी या सर्व लाईमलाईटपासून दूर आहे.
रणजीत यांची मुलगी दिसायला फारच सुंदर आहे. मात्र तिचा कल हा बॉलिवूडकडे नसून एका वेगळ्या क्षेत्रात ती तिचं करीअर करत आहे. तिचं नाव दिव्यांका बेदी असून तिने अभिनय क्षेत्रात पाऊल न ठेवता तिने एका वेगळ्या क्षेत्रात काम करतेय.
View this post on Instagram
खलनायकाची मुलगी काय करते?
रणजीतची मुलगी दिव्यांका एक ज्वेलरी डिझायनर आहे आणि बऱ्याच काळापासून या क्षेत्रात सक्रिय आहे. ज्वेलरी डिझायनिंग व्यतिरिक्त, ती फॅशन डिझायनिंगचाही सराव करते. तसेच तिच्या इंस्टाग्राम बायोमध्ये देखील या बद्दल तिने माहिती दिली आहे. दरम्यान तिच्या पोस्टवरून हे देखील स्पष्ट होते की ती फिटनेसचीही चाहती आहे. ती तिच्या जिम आणि वर्कआउट्सचे असंख्य व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करते. इंस्टाग्रामवर तिची फॅन फॉलोइंगही जबरदस्त आहे. दिव्यांकाने इतर स्टारकिड्स प्रमाणे अभिनय क्षेत्र न निवडता एका वेगळ्या आणि हटके क्षेत्रात ती तिच्या आवडीचे काम करतेय आणि नाव कमावतेय.
200 हून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी खलनायकी भूमिका साकारली
दरम्यान रणजीत यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक भूमिका केल्या, परंतु खलनायकाच्या भूमिकांमुळे त्यांना एक वेगळी ओळख मिळाली. 200 हून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी खलनायकी भूमिका साकारली आहे. 1971 मध्ये आलेल्या “शर्मिली” चित्रपटातून तो खलनायकी म्हणून प्रसिद्ध झाला आणि त्यानंतर “नमक हलाल,” “जालीम,” आणि “झिम्मीदार” सारख्या चित्रपटांमध्ये त्याने खलनायकी भूमिका केल्या. एवढंच नाही तर ते “बिग बॉस” या रिअॅलिटी टीव्ही शोमध्ये स्पर्धक म्हणून देखील दिसले होते.
