Video: महागुरु सचिन पिळगावकरांनी खर्रा हातात घेतला, तोंडाजवळ धरला अन्…

Sachin Pilgaonkar Viral video: सध्या सोशल मीडियावर महागुरु सचिन पिळगावकर यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ते खर्रा सेंटरवर पोहोचल्याचे दिसत आहे.

Video: महागुरु सचिन पिळगावकरांनी खर्रा हातात घेतला, तोंडाजवळ धरला अन्...
sachin Pilgaonkar
Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 06, 2025 | 12:16 PM

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नसतो. सध्या सोशल मीडियावर प्रसिद्ध अभिनेते, महागुरू सचिन पिळगावकर यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ते चक्क खर्रा सेंटवर पोहोचले आहेत. त्यांनी त्यांच्या चित्रपटाच्या टीमसोबत हा खर्रा (तंबाखू) कसा बनवतात हे देखील पाहिले आहे. सोशल मीडियावर त्यांचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ हा सचिन पिळगावकर यांच्या चित्रपटाच्या प्रमोशन निमित्ताने फिरतानाचा आहे. ते चित्रपटाचे सेट उभारण्यात आलेल्या ठिकाणांना जाऊन भेट देताना दिसले. दरम्यान, एका खर्रा सेंटरला देखील त्यांच्या पूर्ण टीमने भेट दिली आहे. खर्रा सेंटरवरील तरुण तेथे येतो आणि सचिन पिळगावकरांना तो कसा बनवायचा हे सांगतो. तरुण त्यांना खर्रा घोटून दाखवतो. त्यानंतर ती पूडी खोलून वास घेण्यासाठी सचिन पिळगावकरांच्या हातावर देतो. सचिन पिळगावकर त्याचा वास घेतात आणि आवर्जुन सांगतात की खर्रा अजिबात खाल्ला नाही पाहिजे. सध्या सोशल मीडियावर त्यांचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.

व्हिडीओमध्ये खर्रा तयार कसा होतो याविषयी तेथे काम करणाऱ्या तरुणाने माहिती दिली आहे. हा तरुण सुपारी, तंबाखू आणि चुना एकत्र करुन खर्रा घोटून घेतो. मशिनमधून घोटलेला हा खर्रा सचिन पिळगावकर चिमटीत घेतात. त्यानंतर तो हातावर घेऊन नाकाजवळ घेऊन जातात आणि वास घेतात. तसेच मिशनमध्ये घोटलेला खर्रा गरम असल्याचे सचिन पिळगावकर म्हणातात. त्यानंतर त्यांनी पुन्हा बनवणाऱ्या तरुणाकडे दिला आहे. सचिन पिळगावकर त्याचा वास घेतात आणि आवर्जुन सांगतात की खर्रा अजिबात खाल्ला नाही पाहिजे.

सचिन पिळगावकर यांचा ‘स्थळ’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन जयंत सोमलकर यांनी केले आहे. लग्नासाठी मुलगी पाहायला गेल्यावर मुलाचे कुटुंबीय बऱ्याचदा मुलीला प्रश्न विचारतात. पण या चित्रपटात मुला ऐवजी मुलीच्या घरातले मुलाला काय प्रश्न विचातात हे दाखवण्यात येणार आहे. याच चित्रपटाचे शुटिंग ज्या ज्या ठिकाणी झाले आहे त्या त्या ठिकाणांना सचिन पिळगावकर भेट देताना दिसले. दरम्यान त्यांनी भेट दिलेल्या खर्रा सेंटरचे नाव गणेश खर्रा सेंटर आहे. त्यांच्यासोबत चित्रपटाची टीमदेखील तेथे उपस्थित असल्याचे दिसत आहे.