मुंबईतील रस्त्यावर माझी पँट उतरवली गेली… महेश भट्ट यांनी सांगितला धक्कादायक किस्सा; थेट म्हणाले, मी…

महेश भट्ट त्यांच्या हीट चित्रपटांमुळे जितके चर्चेत असतात, त्यापेक्षाही अधिक त्यांना टिकेचा सामना करावा लागतो. आता नुकता महेश भट्ट यांनी त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल अत्यंत धक्कादायक आणि हैराण करणारा खुलासा केला आहे, त्याने एकच खळबळ उडालीये.

मुंबईतील रस्त्यावर माझी पँट उतरवली गेली... महेश भट्ट यांनी सांगितला धक्कादायक किस्सा; थेट म्हणाले, मी...
Mahesh Bhatt
Updated on: Oct 08, 2025 | 12:23 PM

महेश भट्ट बॉलिवूडमधील असे एक दिग्दर्शक आणि निर्माते आहेत, जे कायमच वादाने घेरलेले असतात. काही अभिनेत्रींनी त्यांच्यावर गंभीर आरोप केली आहेत. कायमच त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. नुकताच महेश भट्ट हे मुलगी पूजा भट्ट हिच्या पॉडकास्टमध्ये पोहोचले. यादरम्यान त्यांनी एक अत्यंत हैराण करणारा खुलासा केला, यापूर्वी ते कधीही याबद्दल बोलले नव्हते. त्यांचे बोलणे ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. महेश भट्ट यांनी म्हटले की, त्यांची आई शिरीन मोहम्मद अली आणि वडील नानाभाई भट्ट यांच्या आंतरधर्मीय संबंधांमुळे चार मुलांनी त्यांना प्रचंड त्रास दिला. महेश भट्ट यांनी पुढे म्हटले, रात्रीची वेळ होती मी घरी निघाले होतो. रस्तावर खूप जास्त धूळ होती.

अचानक चार मुले माझ्यासमोर येऊन उभी राहिली. त्यांनी मला धक्का दिला आणि भिंतीवर ढकलून दिले. त्या मिनिटाला मला प्रचंड भीती वाटली. मी घाबरलो होतो आणि देवाकडे मदत मागत राहिलो. मी मदतीसाठी ओरडलो देखील… पण माझ्या मदतीला कोणीही धावून आले नाही. रस्त्यावर माणसे जात होती पण तेही कोणी माझ्या मदतीला आले नाही. मी देवाकडे मदत मागत राहिलो तो ही माझ्या मदतीला आला नाही.

मला हे समजण्यास वर्षानुवर्षे लागली की कोणीही तारणहार नाही, तुम्हाला स्वत:ला उभे राहावे लागते. मी त्या चार जणांना घरी जाऊ देण्यासाठी विनंती करत राहिलो. त्यांनी मला घेरले होते आणि मी तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होतो. मी जेव्हा मदत मागत होतो, त्यावेळी त्यांच्यापैकी एक जणांने मला माझी पँट काढण्यास सांगितली. मी त्यांना विनंती करत होतो, मला जाऊ द्या… हेच नाही तर त्यांच्यापैकी एकाला मी धक्का देखील दिला आणि दूर केले.

मी त्यांना म्हटले तुम्ही सर्वजण माझ्यासोबत असे का वागत आहात? त्यांच्यापैकी एकाने म्हटले की, आम्हाला बघायचे आहे की, तू आमच्यापैकी आहेस की नाही… तुझी आई तुझ्या वडिलांची प्रेयसी नाही का? तुझी आई मुस्लिम आहे ना, चित्रपटांमध्ये एक डान्सर म्हणून काम करते ना… एक सांग तुझे नाव महेश का आहे? त्यांचे बोलणे ऐकून मला खूप जास्त धक्का बसला आणि मी फक्त रडत होतो. तरीही ते मला सोडत नसल्याने मी वडिलांना तुमचे नाव सांगतो असे म्हणालो…

मला वाटले की, ते घाबरतील…पण माझे बोलणे ऐकून ते हसायला लागले आणि त्यांनी म्हटले की, तुझे वडील कुठे आहेत ते सांग…ते कुठे राहतात, तुमच्या घरीच राहतात का? त्यांनी मला पुढे म्हटले की, तू फक्त आम्हाला खरे सांग आम्ही तुला इथून जाऊ देतो. त्यानंतर महेश भट्ट यांनी त्या मुलांना काय खरे ते सांगितले आणि यादरम्यान त्यांचा राग पाहून त्या मुलांनी महेश भट्ट यांना जाऊ दिले. आता महेश भट्ट यांनी केलेल्या खुलाश्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.