तांत्रिक, मानवी मांस अन् महेश भट्ट… पूजा भट्टच्या पॉडकास्टमध्ये अंगावर काटा आणणारा खुलासा, नेमकं काय घडलं?
आता पुन्हा एकदा महेश भट्ट चर्चेत आले आहेत. मुलगी पूजा भट्टच्या पॉडकास्टम्ध्ये महेश यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. महेश भट्ट यांनी तांत्रिकाच्या सांगण्यावरून एका फायनान्सरला मानवी मांस चारले होते. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक महेश भट्ट हे नेहमी चर्चेक असतात. त्यांच्या आयुष्यात आणि कारकिर्दीत नेहमी चढउतार पहायला मिळाले होते. त्यांचे सुरुवातीचे चित्रपट फ्लॉप झाले. मात्र कालांतराने त्यांच्या चित्रपटांना चांगले यश मिळाले. अशातच आता पुन्हा एकदा महेश भट्ट चर्चेत आले आहेत. मुलगी पूजा भट्टच्या पॉडकास्टम्ध्ये महेश यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. महेश भट्ट यांनी तांत्रिकाच्या सांगण्यावरून एका फायनान्सरला मानवी मांस चारले होते. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
महेश भट्ट यांनी पूजा भट्ट यांच्या पॉडकास्टमध्ये आपल्या आयुष्यातील एक धक्कादायक खुलासा केला आहे. महेश यांनी आपले नशीब चमकवण्यासाठी वाराणसीतील एका तांत्रिकाच्या सांगण्यावरून एका फायनान्सरला मांस खायला दिले होते. “द पूजा भट्ट शो” मध्ये महेश यांनी म्हटले की, मी चित्रपट निर्माता म्हणून संघर्ष करत होतो, त्यावेळी भट्ट यांना बिहारच्या गया येथील एका चित्रपट फायनान्सरला भेटायचे होते. माझे मित्र अरुण देसाई यांनी सांगितले की वाराणसीमार्गे आपण जाणार आहोत, तिथे माझे गुरु तिथे राहतात त्यांना आपण भेटू. ‘
महेश भट्ट यांनी घेतला तांत्रिकाचा सल्ला
महेश भट्ट म्हणाले की, ‘त्या गुरूंना भेटण्यासाठी खूप मोठी रांग होती. तो तांत्रिक होता, हातात रमची बाटली घेऊन नाचत होता. हे पाहून मला त्याच्यावर विश्वास बसला नाही, तांत्रिकालाही ही गोष्ट समजली. तांत्रिकाने दुसऱ्या दिवशी फोन केला आणि त्याच्यासाठी उपाय असल्याचे सांगितले. दुसऱ्या दिवशी मी तांत्रिकाला भेटायला गेलो, तेव्हा त्याने त्याचे कपाट उघडले आणि रॅपरमध्ये गुंडाळलेली एक बॉलसारखी वस्तू बाहेर काढली. त्याने एक तुकडा तोडला आणि सांगितले की हे मानवी मांस आहे. हे घे आणि तुझ्या फायनान्सरला खायला दे, आणि तो तुला पैसे देईल.’
हे मानवी मांस घेऊन महेश भट्ट गयाला पोहोचले. त्यांनी फायनान्सरची भेट घेतली. या फायनान्सर सोबत बंदुकधारी सुरक्षा रक्षक होते. त्याला मांस खायला कसे घालायचे असा प्रश्न समोर होता. त्यावेळी भट्ट यांना एक कल्पना सुचली. दुसऱ्या दिवशी त्यांनी एक पान विकत घेतले आणि त्या पानातून मांस देण्याचे ठरले. ते पान घेऊन ते फायनान्सरला भेटायला गेले. खुप विनंती केल्यानंतर त्या फायनान्सरने पान खाण्यास होकार दिला.
तांत्रिकाचा उपाय फेल
महेश भट्ट यांनी त्या व्यक्तीला पान खायला दिले. त्याने पान तोंडात घातले आणि ते चावू लागला. महेश भट्ट यांना वाटले की आपण मांस खाऊ घातले मग आपल्याला आता पैसे मिळतील. त्यामुळे ते आनंदी होते. मात्र हा उपाय फेल झाला. त्या व्यक्तीने महेश यांना एकही रुपया दिला नाही.
