
मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचे निधन झाले आहे. प्रसिद्ध कॉस्च्युम डिझायनर असलेल्या दीपा मेहता यांनी 25 सप्टेंबर रोजी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दीपा यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
काय आहे लेकाची पोस्ट?
दीपा आणि महेश मांजरेकर यांचा मुलगा सत्याने सोशल मीडिया पोस्टद्वारे आईच्या निधनाची माहिती दिली आहे. सत्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर दीपा यांचा एक जुना फोटो शेअर केला आहे. त्यावर “मिस यू मम्मा” असे त्याने लिहिले आहे. दुसऱ्या एका फोटोवर त्याने, ‘ती माझ्यासाठी आईपेक्षाही जास्त होती… ती माझ्यासाठी एक प्रेरणा होती. तिची शक्ती, धैर्य इतर मुलींसाठी कायम प्रेरणा ठरली आहे’ या आशयाचे कॅप्शन लिहित आईला श्रद्धांजली वाहिली आहे.
वाचा: 19-20 वर्षाच्या मुलींना माझा व्हिडीओ… प्राजक्ता माळीने सांगितला धक्कादायक अनुभव
Deepa Mehta
महेश मांजरेकर आणि दीपा यांच्याविषयी
महेश मांजरेकर आणि दीपा यांचे १९८७ मध्ये लग्न झाले होते. कॉलेजमध्ये असल्यापासूनच दीपा आणि महेश मांजरेकर यांची ओळख होती. त्यामुळे त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. दोघांना सत्या आणि अश्वमी ही दोन मुले आहेत. पण दीपा आणि महेश मांजरेकर यांचा संसार फार काळ टिकला नाही. लग्नाच्या काही वर्षांमध्येच त्यांचा घटस्फोट झाला. नंतर महेश मांजरेकरांनी मेधा यांच्याशी लग्न करून संसार थाटला. त्यांना सई मांजरेकर ही मुलगी आहे.
दीपा मेहता यांच्याविषयी
दीपा मेहता या कॉस्च्युम डिझायनर होत्या. त्यांचा स्वत:चा ‘क्वीन ऑफ हार्ट्स’ हा साड्यांचा ब्रँड आहे. त्यांच्या लेकीने, अश्वमी मांजरेकरने, या ब्रँडसाठी अनेकदा मॉडेलिंग केले आहे. दीपा या गेल्या कित्येक वर्षांपासून एकट्या राहत होत्या. त्या आपलं काम, मित्रमंडळी आणि कुटुंब यांच्यात रममाण होत्या. त्यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे.