AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Prajakta Mali: 19-20 वर्षाच्या मुलांनी माझा व्हिडीओ… प्राजक्ता माळीने सांगितला धक्कादायक अनुभव

प्राजक्ता माळीने एका कार्यक्रमामध्ये सोशल मीडियाच्या गैरवापराविषयी वक्तव्य केले. तेव्हा तिने एक धक्कादायक अनुभव सांगितला आहे. प्राजक्तासोबत नेमकं काय झालं होतं चला जाणून घेऊया...

| Updated on: Sep 27, 2025 | 5:10 PM
Share
मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळी ओळखली जाते. तिने आजवर मालिका, चित्रपट, वेब सीरिजमध्ये काम करत चाहत्यांची मने जिंकली आहेत. मात्र, महाराष्ट्रा हास्यजत्रा या कार्यक्रमातील तिचे सूत्रसंचालन प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरत आहे. सध्या प्राजक्ता एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे.

1 / 6
प्राजक्ताने नुकताच 'MHJ Unplugged'मध्ये संवाद साधला. त्यावेळी तिने अनेक विषयांवर आपले मत मांडले. तिला सोशल मीडियाच्या वापराचा विषयी देखील प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तिने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

2 / 6
प्राजक्ता माळी म्हणाली की, मला आयुष्यात कोणत्याच गोष्टीची भीती वाटत नव्हती. पण आता सोशल मीडियाची भीती वाटू लागली आहे. मला एकदा सायबर क्राईम महासंचालकांना भेटण्याची संधी मिळाली होती. त्यांनी मला एका वेगळ्याच गोष्टीची माहिती दिली. त्याच सायबर पोलिसांनी दोन मुलांना पकडले होते. त्यांचे वय साधारण 19-20 वर्ष असेल. त्यांना माहितच नव्हतं की ते आयुष्यात नेमकं काय करतायेत.

3 / 6
पुढे प्राजक्ता म्हणाली की, त्यातल्या एकाला मला त्यांनी फोन लावून दिला. मी त्याला विचारलं तू असे का केले? त्याने एक प्रोफाईल उघडले होते. त्यामध्ये फक्त माझे खराब व्हिडीओ होते. मी त्याला विचारले तू असे का केलेस? तर त्याचे उत्तर होते की, तुम्ही ट्रेंडिगमध्ये होतात म्हणून.

4 / 6
खरंतर तो माझा चाहता होता. काहीही टाकायचं म्हणून त्याने ते टाकले होते. शिवाय त्याला हेही कळत नव्हतं की त्याने काय केले आहे. या सगळ्यानंतर त्याने मला विनंती की प्लीज माझ्या घरी सांगू नका. माझे वडील मला चाबकाने मारतील असे प्राजक्ता म्हणाली.

5 / 6
या कार्यक्रमामध्ये प्राजक्ता माळीने सर्वांनाच आवाहन केले सोशल मीडियावर वैयक्तीत आयुष्याविषयी कधीही पोस्ट करु नका.

6 / 6
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार.
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार.