बाळासाहेबांची ‘ती’ ऑफर, घाबरलेले महेश मांजरेकर, म्हणाले, ‘तीन दिवस फोन बंद ठेवला आणि…’

Mahesh Manjrekar On Balasaheb Thackeray Offer: महेश मांजरेकरांना बाबासाहेबांनी अशी कोणती ऑफर दिलेली, जी ऐकून ते घाबरले आणि तीन दिवस फोन बंद ठेवलेला, म्हणाले...

बाळासाहेबांची ती ऑफर, घाबरलेले महेश मांजरेकर, म्हणाले, तीन दिवस फोन बंद ठेवला आणि...
फाईल फोटो
| Updated on: Oct 20, 2025 | 7:42 AM

Mahesh Manjrekar On Balasaheb Thackeray Offer: सिनेविश्वातील अनेकांचे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत जवळचे संबंध होते. अनेक कलाकार बाळासाहेब ठाकरे यांना भेटण्यासाठी देखील यायचे. आज देखील त्यांच्या आठवणी कलाकरांच्या मनात कायम आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी बाळासाहेबांसोबत असलेली एक आठवण सांगितली. बाळासाहेबांनी महेश मांजरेकर यांना एक ऑफर दिलेली, तेव्हा त्यांनी ऑफर नाकारली आणि भीतीमुळे तब्बल तीन दिवस फोन बंद ठेवला होता…

महेश मांजरेकर म्हणाले, ‘मी बाळासाहेबांना फार आवडायचो… ‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’ हा सिनेमा त्यांनी कमीतकमी 70 वेळा तरी पाहिला असेल… त्यांच्याकडे मी कधीच गेलो नाही… तरी ते मला त्यांच्याकडे असलेल्या सिनेमांची डीव्हीडी दाखवायचे…’

बाळासाहेबांनी दिलेल्या ऑफरबद्दल महेश मांजरेकर म्हणाले…

‘बाळासाहेबांच्या घरी मी एकदा गेलेलो… रात्रीची वेळ होती. त्यांनी मला बसायला सांगितलं… म्हणाले, ‘तू मला शिवसेनेत हवा आहेस…’ मी घाबरलो… तेव्हा त्यांची विक्रोळीत सभा होती, मला म्हणाले, ‘तू मला त्या सभेत हवा आहेस…’ मी नकार दिला आणि म्हणालो मा राज ठाकरेचा मित्र आहे… माझे पाय लटपटायला लागले होते… तिथून निघालो. बाहेर पडल्यावर मला राज ठाकरेंचा फोन आला होता.

तीन दिवस का फोन बंद ठेवलेला?

‘राज ठाकरेंचा फोन आला, पण मातोश्रीसमोर माझे इतरबी मित्र होते म्हणून मला फोन उचलता आला नाही… आज राज माझा खूप चांगला मित्र आहे.. त्यानंतर घरी आल्यानंतर मी फोन बंद केला आणि झोपलो… तीन दिवस माझा फोन बंद होता…’ असं देखील मांजरेकर यांनी सांगितलं..

सांगायचं झालं तर, महेश मांजरेकर सध्या ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. नुकताच सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ सिनेमाच्या टीझर लॉन्च दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित होते.

‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ सिनेमाचा सिक्वल आहे ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’?

‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ सिनेमाची घोषणा झाल्यानंतर अनेकांना असं वाटलं की ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ सिनेमाचा सिक्वल आहे. पण नवीन सिनेमा कोणत्या सिनेमाता सिक्वल, दुसरा भाग नसल्याचं महेश मांजरेकर यांनी सांगितलं आहे. मांजरेकर म्हणाले, ‘सिनेमाचा पूर्वी प्रदर्शित झालेल्या सिनेमाशी थेट किंवा अप्रत्यक्ष संबंध नाही. हा सिनेमा आमच्या श्रद्धेतून जन्माला आलेला सिनेमा आहे…’