Mahesh Manjrekar : नानाचा ‘तो’ व्हिडिओ पाहून फोन करावा असं वाटलेलं, पण त्याच दिवशी…महेश मांजरेकर यांनी व्यक्त केली खंत
Mahesh Manjrekar On Nana Patekar : महेश मांजरेकर यांनी नुकत्याच एका मुलाखतीत नाना पाटेकर यांच्या आठवणी सांगितल्या असून एक खंत व्यक्त केली आहे.

महेश मांजरेकर आणि नाना पाटेकर यांच्यात खूप चांगली मैत्री होती. नाना पाटेकर यांच्या निधनाचा महेश यांना मोठा धक्का बसलेला. नुकत्याच एका मुलाखतीत महेश मांजरेकर यांनी एक खंत व्यक्त केली आहे. महेश मांजरेकर म्हणाले की, ‘हा माणूस कधी जाईल, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. मी 6 तारखेला लंडनला गेलो. आमचं 4 तारखेला ‘शंकर जयकिशन‘ नाटक होतं. तेव्हा भरत मला म्हणालेला, ‘नाना तुझी आठवण काढत होते‘ ते अर्धा तास माझ्याबद्दल बोलत होते.’
महेश मांजरेकर यांनी व्यक्त केली खंत
‘मग माझ्या लक्षात आलं, मी बरेच दिवस त्याला फोन केला नाहीये. त्याचेच फोन जास्त यायचे, हेच वाईट वाटतं. ‘कधीतरी एक फोन करत‘ जा असंही तो म्हणायचा. मेधाच्या कॅन्सरबद्दल कळल्यावर तो नेहमी फोन करायचा. तो मेधाला सरकारच म्हणायचा. मी लंडनला गेल्यावर त्याला फोन करेल, असा मी विचार केला. रात्री मी झोपायच्या आधी त्याचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ पाहिलेला. एका पुस्तकाच्या संदर्भातील व्हिडिओ होता. कोणीतरी नव्या लेखकाचं त्यानं कौतुक केलेलं. मेधा पण फोन कर म्हणालेली. पण, उशीर झालेला म्हणून नाही केला.’
‘रात्री 2 वाजता खूप वेळा फोन वाजायला लागला. शेवटी मी फोन उचलला, तेव्हा कळलं नाना गेला. मी स्वप्नातही विचार केला नव्हता. दोन तास आधी मी त्याला फोन करू असा विचार केलेला. त्याच्या शिवीमध्ये पण प्रेम असायचं. ‘नटसम्राट‘ नंतर काहीतरी करायचं ठरवलेलं, पण ते राहूनच गेलं.’ असं महेश यांनी शेवटी सांगितलं. ‘न्यूज 18′ला दिलेल्या मुलाखतीत महेश मांजरेकर बोलत होते.
दरम्यान, 8 ऑक्टोबर 2026 रोजी नाना पाटेकर यांचं वयाच्या 75व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या निधनानं कलाविश्वाला मोठा धक्का बसला. आजही कलाकार नाना पाटेकक यांच्या आठवणी शेअर करतात.