Video : महामार्गावर विखुरल्या बहिणीच्या लग्नपत्रिका; अनेक भाऊ धावले मदतीला, सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव
बहिणाच्या लग्नाच्या पत्रिका नेत असताना, त्या रस्त्यावर पडल्या, एकीकडे वेगाने वाहणारी वाहनं आणि दुसरीकडे इतका खर्च करून छापलेले बहिणीच्या लग्नाची पत्रिका. अशी परिस्थिती निर्माण झाली होती.त्या पत्रिका गोळा करण्यासाठी धाव घेतली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

लग्न म्हटलं की घरात प्रचंड लगबघ सुरू असते. प्रत्येक गोष्टीत मोठा खर्च होत असतो. लग्नात काहीही कमी पडू नये यासाठी घरातील लोक प्रचंड मेहनत करतात पैसे खर्च करतात. त्यात जराही काही बिघडले किंवा खराब झाले तर त्याचा परिणाम लग्नावर होतो. बहिणीच्या लग्नाचे निमंत्रण घेऊन जात असताना गाडीतील पत्रिका रस्त्यावर पसरल्या आणि मोठी अडचण निर्माण झाली. पण महामार्गावरून जाणाऱ्या अनोळखी लोकांनी आपल्या गाड्या थांबवल्या आणि त्या पत्रिका गोळा करण्यासाठी धाव घेतली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
बहिणीच्या लग्नासाठी छापलेल्या लग्नपत्रिका घेऊन एक तरूण प्रवास करत होता. मात्र प्रवासादरम्यान या पत्रिका घेऊन जात असताना महामार्गावर विखुरल्या. एकीकडे वेगाने वाहणारी वाहनं आणि दुसरीकडे इतका खर्च करून छापलेले बहिणीच्या लग्नाची पत्रिका. अशी परिस्थिती निर्माण झाली होती.अशा वेळी त्या एकट्यासाठी पत्रिका गोळा करण जवळपास अशक्य होतं. ही अडचण पाहून महामार्गावरून जाणाऱ्या काही लोकांनी आपली वाहनं थांबवली. त्यांनी रस्त्यावर पडलेल्या लग्नपत्रिका गोळा करण्यासाठी तरूणाला मदत केली. त्यामुळे माणुसकीचे सुंदर दृश्य पाहायला मिळाले आहे.
A little act of kindness.
In India, strangers came together on a busy Bengaluru highway to help a man retrieve his sister’s wedding invitations after strong winds scattered them across the road. https://t.co/VEyAxZRD4m
— Massimo (@Rainmaker1973) November 6, 2026
व्हिडिओ पाहून नेटकरी भावूक
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी या अनोळखी लोकांच कौतुक केलं आहे. आजच्या धावपळीच्या या जगात स्वत:चं काम बाजूला ठेवून दुसऱ्याच्या मदतीला धावून जाणारी माणसं पाहून अनेकांनी समाधान व्यक्त केलं आहे. एक बहिणीच्या लग्नासाठी अनेक भाऊ एकवटले अशा कमेंट्स देखील लोकांनी केले आहे.काही वेळा मोठी मदत करण्यासाठी ओळखीची गरज नसते. फक्त मदतीची भावना असावी लागते.अशा प्रतिक्रिया या व्हिडिओवर उमटत आहेत.
