Ashwini Bhave: अश्विनी भावे यांच्या अशा वागणुकीमुळे..; दिग्दर्शकाने व्यक्त केली नाराजी, अभिनेत्रीने साधी ओळखही दाखवली नाही

Ashwini Bhave: महेश टिळेकर यांनी अश्विनी भावे यांच्या वागण्यासंदर्भात केलेलं भाष्य चर्चेत आलं आहे. 'उमराव जान'च्या वेळीही त्यांनी ओळख दाखवली नसल्याचा खुलासा टिळेकरांनी केला होता.

Ashwini Bhave: अश्विनी भावे यांच्या अशा वागणुकीमुळे..; दिग्दर्शकाने व्यक्त केली नाराजी, अभिनेत्रीने साधी ओळखही दाखवली नाही
Ashwini Bhave
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 05, 2026 | 9:36 AM

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री अश्विनी भावे यांचं नाव आजही प्रेक्षकांच्या मनात आदराने घेतलं जातं. नव्वदच्या दशकात आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अश्विनी भावे सध्या अमेरिकेत वास्तव्यास असल्या तरी मराठी मनोरंजनविश्वाशी त्यांचं नातं कायम आहे. मात्र, प्रसिद्ध दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी एका मुलाखतीत अश्विनी भावे यांच्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती. महेश टिळेकर यांनी एका मुलाखतीत अश्विनी भावे यांच्या वागण्याबद्दल आपलं मत मांडलं होतं. विशेष म्हणजे हा संदर्भ ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि दक्षिणेतील लोकप्रिय अभिनेते ब्रह्मानंदम यांच्या उपस्थितीत झालेल्या एका कार्यक्रमाशी संबंधित होता. या कार्यक्रमादरम्यान घडलेल्या एका प्रसंगाची आठवण सांगताना टिळेकर यांनी आपला अनुभव व्यक्त केला होता.

अश्विनी भावे या मराठी चित्रपटसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहेत. ‘अशी ही बनवाबनवी’, ‘धडाकेबाज’, ‘वजीर’ यांसारख्या चित्रपटांमधून त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. आजही त्यांचा उल्लेख मराठी सिनेसृष्टीतील महत्त्वाच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून केला जातो. अमेरिकेत स्थायिक झाल्यानंतरही त्या विविध माध्यमांतून मराठी संस्कृती आणि मनोरंजनविश्वाशी जोडलेल्या आहेत.

Loading...

महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत महेश टिळेकर म्हणाले होते, “अशोक सराफ यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त मी पुण्यात एक कार्यक्रम आयोजिक केला होता. अश्विनी भावे यांना मी त्या कार्यक्रमासाठी विचारलं होतं. कारण त्यांनी अशोक सराफ यांच्यासोबक आधी काम केलेलं आहे. मी त्यांना मेसेज केले होते, पण त्यांनी उत्तर दिलं नाही. म्हणून मी फोन केला, तरी काहीच प्रतिसाद दिला नाही. मग त्यांच्या मॅनेजरचा फोन आला आणि तिने मला काय काय माहिती सांगितली. पण माझं असं झालं की.. मी तुझ्याशी का बोलू? मी त्यांच्याशीच बोलेन ना. कारण समोरची व्यक्ती परिचयाची असेल तर तुम्ही मॅनेजरला का पुढे करता? या अनुभवानंतर मी त्यांना त्या कार्यक्रमासाठी बोलावलं नाही. त्यांच्या अशा वागणुकीनंतर मला कार्यक्रमासाठी दुसरी चांगली व्यक्ती भेटली.”

“दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचे दिग्गज अभिनेते ब्रह्मानंदम त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. याशिवाय असरानी हेसुद्धा तिथे आले होते. ब्रह्मानंदम आणि माझी काहीच ओळख नव्हती. मी त्यांना मेसेज केला तेव्हा ते म्हणाले की तुम्ही कॉल करा. ते माझ्याशी बोलले. मी परिचय सांगितला. हिंदीचे असरानी, साऊथचे तुम्ही आणि अशोक सराफ असे तीन दिग्गज एकत्र असतील, हे सगळं मी त्यांना कळवलं. त्यांनी काही वेळ मागून घेतला आणि मग स्वत:हून कळवलं की मी येतोय. ते हैदराबादहून आले. ते मला म्हणाले, तू एअरपोर्टला येऊ नकोस. कार्यक्रमाच्या दिवसाची गडबड मला माहीत आहे, आपण तसंही संध्याकाळी भेटणारच आहोत”, असा किस्सा त्यांनी सांगितला.

यावेळी ‘उमराव जान’ या चित्रपटाच्या वेळचाही अनुभव टिळेकरांनी सांगितला. ते पुढे म्हणाले, “उमराव जानच्या वेळीही त्या मला भेटल्या होत्या. पण त्यांनी ओळखच दाखवली नाही. तिथे विद्या बालनसुद्धा होती. तिला मी एकदाच भेटलो होतो. तरी तिने मला ओळख दाखवली होती. मराठीत तुम्ही कसले मॅनेजर वगैरे सांगताय. लक्ष्मीकांत बेर्डे, वर्षा उसगांवकर यांनीसुद्धा हिंदीत काम केलंच ना. पण त्यांनी कधीच मला सांगितलं नाही, मी माझ्या मॅनेजरशी बोल.”

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us