घटस्फोटानंतर एकही रूपये पोटगी नाही, 3 मुलांचा सांभाळ…ओक्साबोक्शी रडली अभिनेत्री, थेट..
मनोरंजन विश्वात सतत घटस्फोटाच्या घटना घडताना दिसत आहेत. बडे बडे कलकार घटस्फोट घेत आहेत. त्यातच आता एका अभिनेत्रीने तिच्या घटस्फोटाबद्दल मोठा खुलासा केला. तिने स्पष्ट केले की, घटस्फोटानंतर तिने एक रूपयाही पोटगी घेतली नाही.

टेलिव्हिजन विश्वात गेल्या काही दिवसांपासून घटस्फोट घेण्याचे प्रमाण खूप जास्त वाढले आहे. दरदिवशी आपल्या अभिनेत्यांच्या घटस्फोटाबद्दल ऐकायला मिळते. त्यातच नुकताच एका अभिनेत्रीने तिच्या घटस्फोटाबद्दल अत्यंत मोठा खुलासा केला. हेच नाही तर ढसाढसा रडत अभिनेत्री सांगितले की, घटस्फोटावेळी तिने एक रूपयांचीही पोटगी पतीकडून घेतली नाही. कोर्टात न्यायाधिशांनी तिला एकदा नाही तर चार वेळा विचारले पण तिने पोटगीला नकार दिला. न्यायाधिशांनी तिला चार वेळा पोटगी घे म्हटले. तरीही तिने पोटगी घेण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला. तिने आपल्या स्वत:च्या जिवावर मुलीचा सांभाळ करण्याचे ठरवले. अभिनेत्री आजच्या घडीला सिंगल मदर असूनही तीन मुलांचा सांभाळ एकटीच करते. अभिनेत्री माही वीज सध्या बिग बॉस 20 च्या घरात आहे. यावेळी तिच्या वैयक्तीक आयुष्यातील गोष्टी सांगताना ती दिसली.
अभिनेत्री तिच्या घटस्फोटाबद्दल सांगताना दिसत आहे. हे सांगताना ढसाढसा रडताना अभिनेत्री दिसली आहे. जयसोबतच्या घटस्फोटाबद्दल बोलणार नसल्याचे अभिनेत्रीने अगोदर सांगिले होते. मात्र, आता ती जयसोबतच्या घटस्फोटाबद्दल बोलताना दिसत आहे. माही वीज हिने म्हटले की, माझी आयुष्य ताराभोलती फिरते. मी एक सिंगर मदर आहे. मी माझ्या आयुष्यात माझ्या मुलीचा सांभाळ एकटीच करते.
मला जय अनेकदा म्हणतो की, तू बाहेर पड मस्त फिरून ये… आयुष्य जग मी ताराला सांभाळतो… पण माझे मन होत नाही, मला माझी मुलगीच लागते काहीही झाले तरीही. पुढे जयसोबतच्या घटस्फोटावर बोलताना तिने म्हटले की, कोर्टात न्यायाधिशांनी मला चार वेळा म्हटले की, पोटगी घे… पण मी घेतली नाही. कारण मला माहिती आहे की, ते त्याच्या मेहनतीचे पैसे आहेत. ती त्याच्या कष्टायची कमाई आहे. मला माहिती आहे की, त्याची तिजोरी आजही माझ्यासाठी उघडी आहे.
पण मी त्याचा एकही रूपया घेणार नाही. कारण मी डोळ्यांनी बघितले आहे की, त्याने ते पैसे किती जास्त मेहनतीने कमावले आहेत. तो 16-16 तास उभे राहून काम करतो. मी त्याच्या कष्टायचे पैसे घेणार नाही. माही वीज आणि जय भानुशाली यांची एक मुलगी आहे, जिचे नाव तारा आहे. ताराचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरस होतात. यासोबतच एक मुलगा आणि एक मुलगी त्यांनी ताराच्या जन्मापूर्वीच दत्तक घेतले.