बुरखा घालणाऱ्या महिलांवर मुस्लीम दिग्दर्शकाचं मोठं विधान, संताप व्यक्त करत म्हणाला…
अनेक महिलांना बुरखा सोयीस्कर वाटतो, पण लोकप्रिय दिग्दर्शकाच्या मते, जर अशी स्थिती असेल, तर ते एका अधोगतीला लागलेल्या समाजाचं लक्षण आहे आणि या मानसिकतेला 'बळी' पडण्याची भूमिका महिलांनी स्वतःच्या मनावर बिंबवून घेतली आहे....

Imtiaz Ali On Burqa : सिनेमात प्रेम, स्वातंत्र्य आणि मानसिक भावनांना उत्तम रित्या पडद्यावर दाखवणाऱ्या दिग्दर्शकाचं एक मोठं विधान सध्या चर्चेत आलं आहे. दिग्दर्शक इम्तियाज अली कायम त्यांच्या सिनेमांमुळे चर्चेत असतात. पण आता इम्तियाज अली कोणत्या सिनेमामुळे नाही तर, त्यांच्या मोठ्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. ‘जब वी मेट’, ‘रॉकस्टार’ आणि ‘हायवे’ यांसारख्या सिनेमांचं दिग्दर्शन करणाऱ्या इम्तियाज अली यांनी आता बुरखा घालणाऱ्या आणि चेहऱ्यावर पदर घेणाऱ्या महिलांबद्दल स्वतःचं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे. बुरखा आणि पदर ही प्रथा दिग्दर्शकाला मुळीच आवडत नाही… अशात दिग्दर्शकाने केलेल्या एका वक्तव्यामुळे सोशल मीडियावर वादाला नवीन कारण मिळालं आहे.
सांगायचं झालं तर, नुकताच इम्तियाज अली यांनी ‘मै वापस आऊंगा’ सिनेमा प्रदर्शित झाला आहे. सिनेमाला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, सोशल मीडियावर इम्तियाज अली याची एक क्लिप व्हायरल होत आहे. त्यात ते अशा महिलांबद्दल बोलतात ज्या बुरखा आणि ‘पदर’ यात स्वतःला सुरक्षित समजतात… एका पॉडकास्टदरम्यान इम्तियाज अली यांनी असं निरीक्षण नोंदवले की, जेव्हा एखादी महिला बुरखा किंवा ‘पदर’मध्ये सहज वाटतं असं म्हणतं, तेव्हा त्यांना ते आवडत नाही.
अली यांच्या मते, जर एखादी व्यक्ती सोयीसाठी अशा निर्बंधांचा स्वीकार करत असेल, तर ते समाजाच्या खालावत चाललेल्या मानसिकतेचं प्रदर्शन करत आहे. ही परिस्थिती हे दर्शवते की संबंधित व्यक्तीने आपल्यावर लादलेल्या निर्बंधांनाच आता ‘सामान्य’ समजण्यास सुरुवात केली आहे. अली म्हणाले, याचा अर्थ असा की, तुम्ही बळी ठरला आहात ही भावना तुमच्या मनात इतकी खोलवर रुजली आहे, जी पूर्णपणे समजून घेणंही कठीण आहे.’
इम्तियाज अली यांनी असं देखील स्पष्ट केलं की, कोणत्याच धर्माला आणि समाजावर मला निशाणा साधायचा नाही. कोणी काय घातलं पाहिजे आणि कसं राहिलं पाहिजे.. हे सांगणारा मी कोणीही नाही. मी फक्त माझे विचार मांडले आहेत… असं देखील इम्तियाज अली म्हणाले. पण काही लोकांनी त्यांच्या विचारांचं समर्थन केलं आहे तर, काहीजण याकडे महिलांची वैयक्तिक पसंती आणि धार्मिक स्वातंत्र्य या दृष्टीकोनातून पाहत आहेत.