AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Makarand Anaspure : पत्नीला कॅन्सर, मी टेन्शनमध्ये आलो…मकरंद अनासपुरे यांनी सांगितला प्रसंग

Makarand Anaspure : मकरंद अनासपुरे यांच्या पत्नीला कॅन्सर झालेला, त्यावेळी नाना पाटेकर त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. याबद्दल मकरंद अनासपुरे यांनी सांगितलं आहे.

Makarand Anaspure : पत्नीला कॅन्सर, मी टेन्शनमध्ये आलो...मकरंद अनासपुरे यांनी सांगितला प्रसंग
| Updated on: Oct 13, 2026 | 2:56 PM
Share

नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्यात चांगली मैत्री होती. नाना पाटेकर यांच्या निधनानंतर मकरंद अनासपुरे भावुक झाले होते. अशातच आता एका मराठी वृत्तपत्रासाठी लिहिलेल्या लेखात मकरंद अनासपुरे यांनी नाना पाटेकर यांच्या आठवणी सांगितल्या आहेत. मकरंद अनासपुरे यांनी सांगितलं की, ते नाना पाटेकर यांना गुरुजी मानायचे. तसेच, गुरुजींकडून मिळालेल्या अनेक धड्यांपैकी हा एक महत्त्वाचा धडा. गुरुजींची चव काही जणांसाठी आंबट, तिखट, कडवट तर काही जणांसाठी गोड असेल. मी सुदैवाने त्यांची गोड चव कायमच अनुभवत राहिलो, असंही मकरंद अनासपुरे यांनी सांगितलं.

मकरंद अनासपुरे यांच्या पत्नीला झालेला कॅन्सर

मकरंद अनासपुरे म्हणाले की, ‘काही वर्षांपूर्वी माझी पत्नी शिल्पाला ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झालं. मी खूप टेन्शनमध्ये आलो. शिल्पानं मला दम दिला की, ‘माझ्या या आजाराविषयी कुणाला काही बोलू नकोस. जर मला कोणी सहानुभूती द्यायला आले तर मी तुला मारीन.’ पण मी गुरुजींपासून काही लपवत नसल्यामुळे त्यांना सांगितलं. त्यांनी लगेचच डॉक्टर राजेंद्र बडवे यांना फोन केला. त्यानंतर तिच्या सगळ्या केमो आणि सर्जरीमध्ये सुद्धा सातत्यानं त्यांनी मला भक्कम पाठिंबा दिला. ती बरी झाली. त्यावेळी मला खूप त्रास होऊ नये, याची सर्वतोपरी काळजी गुरुजींनी घेतली. माझ्याशी वेगवेगळ्या विषयांवर बोलत बसायचं. अनुभव, गमतीदार गोष्टी सांगायचे. आज बायको ठणठणीत बरी झाली. त्याचं श्रेय ती, तिच्या डॉक्टरांबरोबरच गुरुजींनासुद्धा आहे. तिच्या परवानगीनं जाहीरपणे आज हे सांगतो आहे.’

‘उत्साहाने कुठल्याही गोष्टीला स्वतःचं स्टारडम न मिळवता मदत करायला गुरुजींना आवडायचं. ठाण्यातल्या ठाणे आर्ट गॅलरीच्या एका कार्यक्रमाच्या वेळी गुलजार साहेबांची एक कविता, ‘किताबे’ त्यांना नानांच्या आवाजात पाहिजे होती. तेव्हा त्यांनी मला विचारलं की, नाना हे करतील का? मी त्यांना फोन केला. ते म्हणाले, अरे मला आवडेल. त्यांनी त्या कार्यक्रमासाठी वेळ काढून ती कविता रेकॉर्ड करून दिली. ‘यशवंत’ सिनेमाचं जुहू चौपाटीवर शूटिंग होतं. ढोलक वाजवून पैसे गोळा करणाऱ्या रस्त्यावरच्या मुलाला सिनेमात घेतलं होतं. शॉटच्या मध्ये रिकाम्या वेळात नाना त्याला वेगवेगळ्या पद्धतीने ढोलक कसा वाजवायचा, मग जास्त पैसे कसे मिळतील, हे शिकवत होते. शूटिंग संपल्यानंतर प्रॉडक्शन टीमला त्यांनी त्या मुलाला हजार रुपये द्यायला लावले. शिवाय स्वतःही काही पैसे दिले. हा त्यांचा दिलदारपणा शेकडो जणांनी अनुभवला असेलच.’ असं मंकरंद यांनी शेवटी सांगितलं. ‘लोकमत‘या वृत्तपत्रासाठी मकरंद अनासपुरे यांनी लेख लिहिला आहे.

Follow Us
सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत..
Price Rate Hike : सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत सर्वच महाग, काय आहेत नवे दर?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत शिंदेंनी दिली.....
Eknath Shinde On Thane Purneker Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात....
Bihar Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात विद्यार्थी संघटनांची जोरदार घोषणाबाजी
बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे....
Navi Mumbai : बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे; गजानन काळेंचा खळबळजनक दावा
सुप्रीम कोर्टावर मोर्चा काढला हा इतिहासातील काळा दिवस; शिंदेंचा....
Eknath Shinde : सुप्रीम कोर्टावर मोर्चा काढला हा इतिहासातील काळा दिवस; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधींच्या आंदोलनावर घणाघात
ना जास्त मतं, ना कमी, ईश्वरचिठ्ठीने ठरला विजय; यवतमाळमध्ये मविआच्या...
Yavatmal : ना जास्त मतं, ना कमी, ईश्वरचिठ्ठीने ठरला विजय; यवतमाळमध्ये मविआच्या उमेदवाराचा विजय
बॅरिकेटिंग, RAF तैनात अन् पोलिसांचा बंदोबस्त; जंतरमंतरवर आंदोलनाआधीच..
Delhi CJP Protest : बॅरिकेटिंग, RAF तैनात अन् पोलिसांचा बंदोबस्त; जंतरमंतरवर आंदोलनाआधीच CJP नेत्यांना रोखलं
आंदोलनं दडपली तर...; संजय राऊतांचा केंद्र सरकारला इशारा, म्हणाले...
Sanjay Raut : आंदोलनं दडपली तर...; संजय राऊतांचा केंद्र सरकारला इशारा, म्हणाले...
आशुतोष रांका, सौरव दास यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं
CJP : आशुतोष रांका, सौरव दास यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं; नेमकं काय घडलं?
बँकेत कर्मचारी केक कापण्यात व्यस्त, शेतकरी मात्र...; व्हिडिओ व्हायरल
Viral Video : बँकेत कर्मचारी केक कापण्यात व्यस्त, शेतकरी मात्र...; बुलडाण्यातील व्हिडिओ व्हायरल