AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घटस्फोटानंतर 12 वर्ष लहान अभिनेत्यासोबत ‘प्रेमसंबंध’, वयाच्या 51 व्या वर्षी रॉयल आयुष्य जगतेय ‘ही’ अभिनेत्री

Bollywood Actress: लग्नाच्या 19 वर्षांनंतर घटस्फोट, एका मुलाची आई 12 वर्ष लहान अभिनेत्याच्या प्रेमात, 'ही' अभिनेत्री वयाच्या 51 व्या वर्षी जगते रॉयल आयुष्य..., अभिनेत्री कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे असते....

घटस्फोटानंतर 12 वर्ष लहान अभिनेत्यासोबत 'प्रेमसंबंध', वयाच्या 51 व्या वर्षी रॉयल आयुष्य जगतेय 'ही' अभिनेत्री
| Updated on: Oct 23, 2024 | 8:15 AM
Share

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी घटस्फोटानंतर नव्या आयुष्याची आयुष्याची सुरुवात केली. पुन्हा एका नव्या व्यक्तीचं आयुष्यात स्वागत केलं. अशात अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अभिनेत्री मलायका अरोरा. मलायका हिला आज कोणत्या ओळखीची गरज नाही. अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये आयटम सॉन्ग करत स्वतःची ओळख निर्माण केली. बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करत असताना मलायका खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत आली. आज मलायका तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी आणि खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असते.

मलायका हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, 1998 साली प्रदर्शित झालेल्या ‘दिल से’ सिनेमातून अभिनेत्री एका रात्रीत स्टार झाली. ‘दिल से’ सिनेमातील ‘छैय्या छैय्या’ गाण्यामुळे मलायकाला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. त्यानंतर मलायकाने कधीच मागे वळून पाहिलं नाही. तर अभिनेता अरबाज खान सोबत झालेल्या घटस्फोटामुळे देखील अभिनेत्री चर्चेत आली.

अभिनेता अरबाज खान याच्यासोबत लग्नानंतर मलायकाने मुलाल जन्म दिला. अरबाज – मलायका यांच्या मुलाचं नाव अरहान खान असं आहे. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. मलायका आणि अरबाज यांनी लग्नाच्या 19 वर्षांनंतर घटस्फोटाची घोषणा केली.

2017 मध्ये मलायका आणि अरबाज यांनी घटस्फोटाची घोषणा केली. त्यानंतर मलायका हिच्या आयुष्यात अभिनेता अर्जुन कपूर याची एन्ट्री झाली. 2019 मध्ये मलायका आणि अर्जुन यांनी नात्याची अधिकृत घोषणा केली. मलायका आणि अर्जुन यांच्यामध्ये 12 वर्षांचं अंतर आहे. अर्जुन कपूर 39 वर्षांचा आहे तर, मलायका 51 वर्षांची आहे.

अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर मलायका – अर्जुन यांचं देखील ब्रेकअप झालं. गेल्या अनेक दिवसांपासून दोघे एकत्र दिसले देखील नाही. पण आजही दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

मलायका हिने तिच्या खासगी आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले आहे. पण वडिलांच्या निधनानंतर अभिनेत्रीला सर्वात मोठा धक्का बसला. 11 सप्टेंबर 2024 मध्ये अनिल मेहता यांनी इमारतीवरून उडी मारून स्वतःचं आयुष्य संपवलं. याप्रकरणी सध्या चौकशी सुरु आहे.

सांगायचं झालं तर, बॉलिवूडमध्ये मलायका स्वतःची ओळख प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री म्हणून निर्माण करू शकली नाही. पण अभिनेत्रीने तिच्या सौंदर्याने आणि डान्स चागत्यांना घायाळ केलं. आज अभिनेत्रीचा वाढदिवस असल्यामुळे सर्वत्र मलायकाची चर्चा रंगली आहे.

Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता