Malaika Arora: वाढत्या वयावर प्रश्न विचारताच भडकली 52 वर्षीय मलायका अरोरा, पुरुषांबद्दल असं काय म्हणून गेली…
Malaika Arora: वाढत्या वयाबद्दल प्रश्न विचारताच भडकली अभिनेत्री मलायका आरोरा... वयाच्या 52 व्या वर्षाही तरुणींना लाजवेल असं सौंदर्य... अभिनेत्री पुरुषांबद्दल असं काय बोलून गेली...

Malaika Arora: अभिनेत्री मलायका आरोरा हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. मलायका कोणत्याच सिनेमात मुख्य अभिनेत्री म्हणून झळकली नाही. पण अभिनेत्री डान्सच्या जोरावर इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं स्थान भक्कम केलं आहे. आज वयाच्या 52 व्या वर्षी देखील मलायका अत्यंत फिट दिसतं. गेल्या 30 वर्षांपासून मलायका बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. पण अभिनेत्री तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी, पण खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असते. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत मलायका हिने महिलांना त्यांच्या वाढत्या वयाबद्दल विचारल्या जाणाऱ्या प्रश्नावर मोठं वक्तव्य केलं आहे. एवढंच नाही तर, अभिनेत्रीने पुरुषांबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं आहे.
नुकताच झालेल्या एका पॉडकास्टमध्ये मलायका म्हणाली, ‘काही दिवस असे असतात माझ्या मनात या गोष्टी येतात, तर काही दिवस असे देखील असतात, समोर दिसत असलेल्या गोष्टींवर मी स्पष्ट प्रश्न उपस्थित करते. तर काही दिवस असे देखील असतात, जेव्हा मला काहीच फरक पडत नाही… कारण मी जे करत आहे ते मला आवडत आहे आणि मी माझ्या आयुष्यातील सर्वात चांगले दिवस जगत आहे… अद्यापही खूप काही करण्यासाठी मी उत्सुक आहे…याच गोष्टी माझ्यासाठी अधिक महत्त्वाच्या आहेत.’
पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘सर्वात जास्त लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, पुरुषांना कधीच त्यांच्या वयाबद्दल विचारण्यात येत नाही. पण महिलांना कायम त्यांच्या वयाबद्दल विचारण्यात येतं… महिलांना कायम त्यांच्या सौंदर्याबद्दल विचारण्यात येतं… याउलट, पुरुषांना क्वचितच अशा प्रकारच्या चौकशीला सामोरं जावं लागतं.’
‘स्त्रीकडून नेहमीच ती कशी दिसते याचं वर्णन करण्याची अपेक्षा केली जाते, आणि विचारलं जातं, ‘तुम्हाला अजूनही वाटतं का की तुम्ही सुंदर आहात? तुम्हाला अजूनही वाटतं का की तुम्ही आकर्षक आहात? या वयात असणं कसं वाटतं?’ हे प्रश्न पुरुषांना जवळजवळ कधीच विचारले जात नाहीत.’, असं देखील मलायका म्हणाली.
मलायका हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने आता एका हिरे व्यापाऱ्याला डेट करत असल्याच्या चर्चा आहे. दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. एवढंच नाही तर, याआधी अभिनेत्री अर्जुन कपूर याला डेट करत होती. तर, 2017 मध्ये अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर, अभिनेत्रीने 2019 मध्ये अर्जुन याच्यासोबत असलेल्या नात्याची घोषणा केली. पण दोघांचं नातं फार काळ काही टिकलं नाही.