AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AFG: तिसरा सामना पावसामुळे रद्द होणार? जाणून घ्या कसं असेल हवामान

IND vs AFG 3rd ODI Weather Forecast Report : भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील पहिल्या एकिदवसीय सामन्यात पावसाने खोडा घातला होता. त्यात आता तिसऱ्या सामन्यावर पावसाचं सावट आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.

IND vs AFG: तिसरा सामना पावसामुळे रद्द होणार? जाणून घ्या कसं असेल हवामान
IND vs AFG 3rd Odi Weather ForcastImage Credit source: AFP
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Jun 19, 2026 | 11:42 PM
Share

अफगाणिस्तानच्या भारत दौऱ्याची सांगता (Afghanistan Tour Of India 2026) 20 जूनला होणार आहे. यजमान टीम इंडिया अफगाणिस्तान विरूद्धच्या 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. भारताने सलग दुसरा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर केली. आता टीम इंडिया सलग तिसरा एकदिवसीय सामना जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहे. हा सामना शनिवारी 20 जून रोजी चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियममध्ये होणार आहे. मात्र या सामन्यावर पावसाचं सावट आहे.  त्यामुळे हा सामना रद्द होणार का? अशी चाहत्यांना भीती आहे. या निमित्ताने चेन्नईत सामन्यादरम्यान हवामान कसं असेल? हे जाणून घेऊयात.

हवामान कसं असेल?

भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 1 वाजता टॉस होईल. सामना सुरु होण्यादरम्यान पाऊस होण्याची शक्यता अधिक आहे. तर संध्याकाळपर्यंत पावसाची शक्यता कमी होईल. मालिकेतील पहिल्या सामन्यातही पावसाने खोडा घातला होता. पाऊस 13 जून रोजी जोरदार बरसला. त्यामुळे 50 ऐवजी 25 ओव्हरचा सामना खेळवण्यात आला. त्यामुळे चेन्नईतही पाऊस आला तर 50 षटकांचा खेळ होणार नाही, इतकं मात्र निश्चित आहे.

हवामानाचा अंदाज काय?

एक्युवेदरच्या रिपोर्ट्सनुसार, सामन्यादरम्यान ढगाळ वातावरण असेल. तसेच पावसाची शक्यता ही 50 टक्के इतकी आहे. तर संध्याकाळी पावसाची शक्यता 17 ने कमी होऊन 33 टक्के इतकी होईल.

भारतीय संघाची चेन्नईतील आकडेवारी

भारतीय संघाने वनडेत चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमध्ये किती सामने जिंकले आहेत? हे जाणून घेऊयात. टीम इंडियाने या मैदानात 1987 साली पहिला एकदिवसीय सामना खेळला होता. तेव्हापासून टीम इंडियाने या मैदानात एकूण 15 सामने खेळले आहेत.

टीम इंडियाने या मैदानात 15 पैकी 8 सामने जिंकले आहेत. तर 6 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर भारताचा या मैदानातील 1 सामना हा रद्द करावा लागला होता. त्यामुळे भारतीय संघाचा शनिवारी सामना जिंकून या मैदानातील आकडेवारी आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न असणार आहे.

शुबमन गिल किती धावा करणार?

दरम्यान भारतीय क्रिकेट चाहत्यांचं तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात कर्णधार शुबमन गिल याच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे. शुबमनने अफगाणिस्तान विरुद्धच्या पहिल्या सामन्यात 84  धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या सामन्यात शुबमनने 154 धावांची खेळी केली होती. त्यामुळे शुबमन तिसऱ्या सामन्यात द्विशतकापर्यंत पोहचणार का? याची चाहत्यांना उत्सूकता असणार आहे.

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी