Malaika Arora: “माझा निर्णय योग्य होता”; फराह खानसमोर बोलताना मलायकाला अश्रू अनावर

कॅमेरासमोर मलायका का झाली भावूक? खासगी आयुष्यातील निर्णयांबद्दल झाली व्यक्त

Malaika Arora: माझा निर्णय योग्य होता; फराह खानसमोर बोलताना मलायकाला अश्रू अनावर
Malaika Arora
Image Credit source: Instagram
| Updated on: Dec 04, 2022 | 8:40 AM

मुंबई: बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री मलायका अरोरा हिचा नवीन शो ‘मूव्हिंग इन विथ मलायका’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर या शोचे एपिसोड्स पहायला मिळणार आहेत. या शोच्या पहिल्या एपिसोडचा प्रोमो व्हिडीओ नुकताच समोर आला आहे. यामध्ये कोरिओग्राफर आणि खास मैत्रीण फराह खानशी बोलताना मलायकाला अश्रू अनावर होतात. या शोमध्ये मलायका तिच्या खासगी आयुष्याविषयी मोकळेपणे व्यक्त होणार आहे.

मलायकासाठी करीना कपूरचा मेसेज

मूव्हिंग इन विथ मलायका या शोमध्ये मलायका तिच्या आयुष्यातील अनेक पैलू चाहत्यांसमोर मांडणार आहे. “लोकांना वायफळ चर्चा करणं खूप आवडतं”, असं ती शोच्या नव्या प्रोमोमध्ये म्हणते. त्यानंतर मलायकाची खास मैत्रीण आणि अभिनेत्री करीना कपूर खान शोमध्ये हजेरी लावते.

करीना मलायकाबद्दल म्हणते, “माझ्या मते मलायका रॉक-सॉलिड आहे. थट्टामस्करी करण्याची तिची सवय आहे, त्याचसोबत ती दिसायला अत्यंत हॉट आणि सुंदर आहे.” हे म्हणत असतानाच ती मलायकाला आयुष्यात पुढे जाण्याचा सल्ला देते.

करीनाचं बोलणं झाल्यानंतर मलायका तिच्या हातात माईक घेते आणि म्हणते, “मी मूव्ह ऑन झाले आहे. माझ्या एक्सनेही मूव्ह ऑन केलंय. तुम्ही सगळे कधी मूव्ह ऑन होणार?” या एपिसोडमध्ये मलायकाची बहीण अमृता अरोरानेही हजेरी लावली होती.

कोरिओग्राफर फराह खानशी बोलताना ती पुढे म्हणते, “मी माझ्या आयुष्यात जे काही निर्णय घेतले, ते सर्व बरोबर होते.” हे म्हणतानाच मलायकाला अश्रू अनावर होतात. मलायकाचा हा नवीन शो येत्या 5 डिसेंबरपासून सोमवार ते गुरूवार रात्री 8 वाजता डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Follow Us