
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा पुन्हा एकदा खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. यावेळी कोणत्याही रिअॅलिटी शो किंवा फॅशन वॉकसाठी नाही, तर एका व्हायरल व्हिडीओमुळे ती चर्चा सुरु आहेत. शनिवारी रात्री मुंबईच्या MMRDA ग्राउंडमध्ये आयोजित ग्रॅमी अवॉर्ड विजेता गायक एनरिक इग्लेसियस (Enrique Iglesias) च्या कॉन्सर्टमध्ये मलायकाला स्पॉट करण्यात आले, जिथे ती एका ‘मिस्ट्री मॅन’ सोबत मजा करताना दिसली.
कॉन्सर्टचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मलायका एखाद्या अनोळखी व्यक्ती सोबत डान्स करताना आणि गप्पा मारताना दिसत आहे. या व्हिडीओमुळे रेडिट आणि इन्स्टाग्रामवर फॅन्समध्ये चर्चा सुरू झाली आहे की, मलायकाने अर्जुन कपूरपासून वेगळे झाल्यानंतर नव्या नात्याची सुरुवात केली आहे.
कॉन्सर्टमध्ये मलायकाचा ग्लॅमरस लूक
मलायका या कॉन्सर्टला व्हाइट फिटेड टँक टॉपमध्ये दिसली. त्यावर तिने ब्राउन ट्राउझर्स आणि स्लीक व्हाइट बेल्ट घातला आहे. गोल्डन बँगल्स, डेलिकेट गोल्ड चेन आणि मिनिमल मेकअपमध्ये ती स्टनिंग दिसत होती. ऑडियन्समध्ये उभी असलेली मलायका एनरिकच्या हिट्सवर टाळ्या वाजवत, डान्स करत आणि स्टेजकडे फ्लाइंग किस करताना दिसली.
मिस्ट्री मॅन सोबत व्हायरल व्हिडीओ
कॉन्सर्टदरम्यान मलायकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रेडिटवर युजर्सनी दावा केला की अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर मलायकाच्या आयुष्यात नवे प्रेम खुलले आहे. एका युजरने लिहिले, ‘अखेर मलाइकाने स्टँडर्ड्स वाढवले आणि चांगला दिसणारा मुलगा शोधला. आधी अरबाज आणि अर्जुनसारखे चॉइस तर चांगले नव्हते.’ मात्र, काही युजर्सनी अफवांना नाकारले. एकाने म्हटले, ‘फेक इन्फॉर्मेशन, तो त्यांचा मॅनेजर आहे.’ दुसऱ्याने लिहिले, ‘मॅनेजर आहे.’