AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तारक मेहता मालिकेच्या एक्स दिग्दर्शकाचा धक्कादायक खुलासा, शोमधील कलाकारांबद्दल मोठे विधान करताना दिसला मालव राजदा

गेल्या काही वर्षांपासून तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका प्रेक्षकांचे जोरदार मनोरंजन करताना दिसत आहे. विशेष म्हणजे या मालिकेला चाहत्यांचे मोठे प्रेम मिळताना देखील दिसते. मात्र, तारक मेहता मालिकेचे निर्माता असित कुमार मोदीवर गंभीर आरोप केले जात आहेत.

तारक मेहता मालिकेच्या एक्स दिग्दर्शकाचा धक्कादायक खुलासा, शोमधील कलाकारांबद्दल मोठे विधान करताना दिसला मालव राजदा
| Updated on: Aug 18, 2023 | 3:25 PM
Share

मुंबई : तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका गेल्या पंधरा वर्षांपासून चाहत्यांचे जोरदार मनोरंजन (Entertainment) करताना दिसत आहे. तारक मेहता मालिकेची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. विशेष म्हणजे प्रत्येक वयोगटातील सर्वांनाच ही मालिका प्रचंड आवडते. तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतील कलाकारांची देखील मोठी फॅन फाॅलोइंग (Fan following) ही सोशल मीडियावर बघायला मिळते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप होताना दिसत आहेत.

असित कुमार मोदी यांच्यावर होत असलेल्या आरोपांनंतर आता चाहत्यांना देखील मोठा धक्का बसल्याचे दिसत आहे. शैलेश लोढा यांनी तर असित कुमार मोदी यांच्या विरोधात थेट कोर्टात धाव घेतली. शैलेश लोढा यांनी असित कुमार मोदीवर अत्यंत गंभीर आरोप केले आणि म्हटले की, माझ्या कामाचे पैसे मला दिले जात नाहीत.

शैलेश लोढाच नाही तर तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेचे 14 वर्षांपासून असलेले दिग्दर्शक मालव राजदा याने शोला रामराम केला आहे. आयुष्यामध्ये पुढे काही गोष्टी चांगल्या करायच्या असल्याने शो सोडत असल्याचे अगोदर मालव राजदा म्हटले होते. मात्र, असित कुमार मोदीसोबत असलेल्या वादामुळेच मालव राजदा शो सोडल्याचे कळते.

नुकताच आता मालव राजदाने सोशल मीडियावर खास चाहत्यांसाठी एका सेशनचे आयोजन केले होते. यावेळी काही मोठे खुलासा करताना मालव राजदा दिसला. यावेळी तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतील कलाकारांबद्दल धक्कादायक खुलासा करताना मालव राजदा हा दिसला आहे.

मालव राजदा म्हणाला की, मला समजले की, तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतील जास्त करून कलाकार हे गिरगिटसारखे आहे. जेनिफर मिस्त्री बन्सीवाल, अमित भट्ट, अझहर शेख, पलक सिंधवानी यांच्यासोबत असलेल्या मैत्रीवर बोलताना देखील मालव राजदा हा दिसला आहे.

एका चाहत्यांने मालव राजदाला तारक मेहता मालिकेमधील पुनरागमनाबद्दल प्रश्न विचारला. यावेळी मालव राजदा म्हणाला की, ही संभव गोष्ट नाहीये. म्हणजेच काय तर मालव राजदा याने स्पष्ट केले की, परत तो कधीच तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेत दिसणार नाहीये. गेल्या काही दिवसांपासून अनेक कलाकार हे असित मोदीवर आरोप करताना दिसत आहेत.

Follow Us
उदय सामंत: 'एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य'
उदय सामंत: एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य
मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे
'मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे', रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेंची प्रतिक्रिया
मराठी न बोलल्यास परवाना रद्द करण्याच्या धमक्यांवरचा दुबेंचा इशारा
संजय दुबे यांचा प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषेच्या सक्तीला थेट विरोध
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल:
शरद पवार एनडीएमध्ये जाणार नाहीत, विरोधातच राहणार
पवारांकडून एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या; पक्ष कार्यकर्त्यांना दिले स्पष्ट निर्देश
देशमुखांचं कारागृह महानिरीक्षकांना पत्र; गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी
धनंजय देशमुखांचे बीड कारागृह महानिरीक्षकांना पत्र: गैरप्रकार चौकशी आणि आरोपी स्थलांतराची मागणी
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर? ठाण्यातील कार्यक्रमात भाजप नेत्यांची अनुपस्थिती
बेस्ट कामगारांचा बेमुदत संप; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
बेस्ट कामगारांचा मंगळवारपासून बेमुदत संप: प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
पालकमंत्री महाजनांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना मदत
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना अवयव प्रत्यारोपणासाठी मदत