मुलांसोबत नको ते कृत्य केलं, प्रसिद्ध अभिनेत्याला थेट 1 वर्षाचा तुरुंगवास; नेमकं काय घडलं?

फिल्म इंडस्ट्रीमधून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्याला POCSO कायद्याअंतर्गत एक वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

मुलांसोबत नको ते कृत्य केलं, प्रसिद्ध अभिनेत्याला थेट 1 वर्षाचा तुरुंगवास; नेमकं काय घडलं?
Sreejith Ravi
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Nov 24, 2026 | 10:10 AM

एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेते श्रीजित रवी यांना अल्पवयीन मुलांशी संबंधित एका प्रकरणात न्यायालयाने एक वर्षाची कठोर तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. यासोबत त्यांच्यावर ५० हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. केरळमधील त्रिशूरच्या फास्ट ट्रॅक कोर्टाने सोमवार, २३ नोव्हेंबर रोजी हा निर्णय दिला आहे. मात्र, अभिनेत्याला सध्या दिलासाही मिळाला आहे. अपील करण्यासाठी न्यायालयाने त्याची शिक्षा एक महिन्यासाठी स्थगित केली आहे आणि जामीन दिला आहे.

हे प्रकरण ४ जुलै २०२२ चे आहे. अभियोजन पक्षानुसार, दोन अल्पवयीन मुले शाळेतून घरी परतत होती. त्याच वेळी श्रीजित रवी यांनी कथितपणे त्यांच्यासमोर आपले खाजगी अवयव दाखवले आणि त्यांना धमकावले. मुलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी प्रकरण नोंदवले होते.

Loading...

फास्ट ट्रॅक स्पेशल कोर्टात झाली सुनावणी

या प्रकरणाची सुनावणी त्रिशूरच्या फास्ट ट्रॅक स्पेशल कोर्टात झाली. न्यायाधीश रेम्या मेनन यांनी श्रीजित रवी यांना भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम ५०९ आणि POCSO कायद्याच्या कलम ११(i) अंतर्गत दोषी ठरवले. न्यायालयाने त्यांना POCSO कायद्यांतर्गत एक वर्षाची कठोर तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. याशिवाय ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास त्यांना एक महिन्याची अतिरिक्त शिक्षा भोगावी लागेल.

शिक्षा सुनावल्यानंतर श्रीजित रवी यांनी केरळ उच्च न्यायालयात निर्णयाला आव्हान देण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर न्यायालयाने त्यांची शिक्षा एक महिन्यासाठी स्थगित केली. त्यांना ५० हजार रुपयांच्या बॉन्ड आणि दोन जामिनदारांच्या अटीवर जामीन देण्यात आला आहे. त्यांना २३ डिसेंबर २०२६ रोजी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

हायकोर्टात अपील करणार अभिनेता

या प्रकरणात अभिनेत्याने २०२२ मध्ये ट्रायल कोर्टात डिस्चार्ज याचिका दाखल केली होती, पण न्यायालयाने ती फेटाळली होती. त्यानंतर त्यांनी केरळ उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. तिथूनही दिलासा न मिळाल्यानंतर प्रकरणाची सुनावणी सुरू झाली. सुनावणीदरम्यान, अभियोजन पक्षाने २१ साक्षीदारांचे जबाब नोंदवले.

श्रीजित रवी कोण आहेत?

५० वर्षीय श्रीजित रवी मल्याळम चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेते आहेत. ते दिग्गज अभिनेते टी.जी. रवी यांचे पुत्र आहेत. त्यांनी २००५ मध्ये अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. मल्याळम चित्रपटांव्यतिरिक्त ते तामिळ सिनेमातही काम केले आहे. ते अनेक चित्रपटांत कॅरेक्टर रोल्समध्ये दिसले आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us