अभिनेत्री मल्लिका शेरावत आता ‘बिग बॉस 19’मध्ये सहभागी होणार? काय आहे सत्य?
मल्लिका शेरावतच्या 'बिग बॉस 19'मध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे असं म्हटलं जात आहे. आता स्वत: मल्लिका शेरावतने यावर प्रतिक्रिया दिली आहे ती काय म्हणाली ते जाणून घेऊयात.

प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी ‘बिग बॉस 19’ लवकरच येणार आहे. अशा परिस्थितीत, शोमध्ये येणाऱ्या स्पर्धकांची नावे दिवसेंदिवस समोर येत आहेत. तथापि, अधिकृत यादी अद्याप आलेली नाही. पण ‘बिग बॉस 19’ च्या नवीन सीझनचा फर्स्ट लूक समोर आला. सुपरस्टार सलमान खानचा शो ‘बिग बॉस’ लवकरच त्याच्या नवीन सीझनसह धमाकेदार एंट्री करण्यासाठी सज्ज आहे. शोची तयारी पूर्ण झाल्याचंही म्हटलं जात आहे. अशा परिस्थितीत, प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे की यावेळी शोमध्ये कोण कोण सहभागी होणार आहे. शोच्या स्पर्धकांबद्दल अनेक प्रकारच्या अफवाही पसरल्या. त्याच वेळी, अभिनेत्री मल्लिका शेरावत देखील सलमान खानच्या ‘बिग बॉस 19’ शोमध्ये दिसणार असल्याची बातमी समोर आली आहे.
अभिनेत्रीने ‘बिग बॉस 19’ मध्ये सामील होणार?
मात्र आता याबाबत ती ‘बिग बॉस 19’मध्ये दिसणार आहे की नाही याबाबत संभ्रम असतानाच तिने याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. मल्लिका शेरावतने इंस्टा स्टोरीवर एक नोट शेअर केली. ‘बिग बॉस 19’ मध्ये सामील होण्याच्या बातम्यांवर भाष्य केलं आहे. इंस्टा स्टोरीद्वारे ‘बिग बॉस १९’ मध्ये येण्याच्या बातम्यांचे खंडन केले आहे. तिने असे लिहिले आहे की ती कधीही हा शो करणार नाही. तिने म्हटलं आहे, “‘सर्व अफवांवर ब्रेक लावत, मी बिग बॉस करत नाही आणि कधीही करणार नाही. धन्यवाद”
- Mallika Sherawat
मल्लिका आणि सलमानचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता.
मल्लिका गेल्या सीझनमध्ये ‘बिग बॉस’ मध्ये पाहुणी म्हणून नक्कीच दिसली होती. ती तिच्या ‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आली होती. या चित्रपटात तिच्यासोबत राजकुमार राव आणि तृप्ती डिमरी देखील मुख्य भूमिकेत होते. या दरम्यान तिने सलमान खानसोबत खूप मजाही केली होती. मल्लिका आणि सलमानचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता.
नवीन सीझनचा एक प्रोमो
बिग बॉस सीझन 19 बद्दल बोलायचं झालं तर निर्मात्यांनी अलीकडेच नवीन सीझनचा एक प्रोमो व्हिडिओ शेअर केला आहे. यावेळी प्रोमोमध्ये बिग बॉसचा नवीन लोगो देखील दिसत आहे. यावेळीही प्रेक्षकांना बिग बॉसच्या घरात नाट्य, संघर्ष आणि मनोरंजनाचा जबरदस्त डोस मिळणार आहे असं दिसत आहे. तसेच यावेळी बिग बॉसची थीम काय असणार आहे यासाठी देखील चाहते उत्सुक आहेत.
View this post on Instagram
शोचे स्पर्धक?
स्पर्धकांबद्दल बोलायचे झाले तर याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत बातमी आलेली नाही. रिपोर्टनुसार, राम कपूर आणि गौतमी कपूर, धीरज धूपर, अलिशा पनवार, मुनमुन दत्ता, अनिता हसनंदानी, लता सभरवाल, आशिष विद्यार्थी, खुशी दुबे, गौरव तनेजा आणि अपूर्व मखिजा या शोमध्ये सामील होऊ शकतात अशी चर्चा आहे. पण शोमध्ये असणाऱ्या स्पर्धकांची लिस्ट लवकरच जाहीर होणार आहे.
