
Mamta Kulkarni: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ते महामंडलेश्वर बनलेली ममता कुलकर्णी नुकताच एका शोमध्ये पोहोचली होती. यावेळी ममता हिने बाबा रामदेव आणि धीरेंद्र शास्त्री यांच्यावर टीका केली. रामदेव बाबा यांना महाकाल आणि महाकाली यांची भीती असायला हवी… पुढे ममता हिने धीरेंद्र शास्त्री यांच्या वयावर टीका केली. सध्या सर्वत्र ममता कुलकर्णी हिची चर्चाा रंगली आहे. ममता कुलकर्णी हिने किन्नर आखाड्यात सामिल होऊन संन्यास धारण केला आहे. यावर अनेक धार्मिक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
ममता कुलकर्णी हिला महामंडलेश्वर पदवी दिल्यानंतर रामदेव बाबा यांनी स्वतःचं मत व्यक्त केलं होतं. ‘एका दिवसात कोणीही संतपद प्राप्त करू शकत नाही. हे पद मिळवण्यासाठी अनेक वर्ष तपस्या करावी लागते. आजच्या दिवसांत मी पाहत आहे कोणालाही उचलून महामंडलेश्वर केलं जातंय…’ असं रामदेव बाबा म्हणाले होते. तर धीरेंद्र शास्त्री म्हणाले, कोणत्याही प्रकारच्या बाह्य प्रभावाखाली येऊन कोणाला संत किंवा महामंडलेश्वर कसा बनवता येईल? पदवी अशा व्यक्तीला दिली पाहिजे जिच्यामध्ये संत किंवा साध्वीची भावना असेल…
सांगायचं झालं तर, ममता कुलकर्णी ‘आपकी अदालत’ शोमध्ये पोहोचली होती. शोमध्ये रजत शर्मा यांनी ममता हिला रामदेव बाब आणि धीरेंद्र शास्त्री यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर ममता हिने देखील सडतोड उत्तर दिलं आहे.
ममता कुलकर्णी म्हणाली, ‘आता मी रामदेव बाबा यांना काय बोलू… त्यांना महाकाली आणि महाकाल यांची भीती असायला हवी…’ पुढे धीरेंद्र शास्त्री यांनी उत्तर देत म्हणाली, ‘तो नॅपी धीरेंद्र शास्त्री… जेवढं त्यांचं वय आहे, तेवढी मी तपस्या केली आहे. धीरेंद्र शास्त्री यांना एकच सांगेल, स्वतःच्या गुरुंना विचारा मी कोण आहे आणि शांत बसा…’ सध्या सर्वत्र ममता कुलकर्णी हिची चर्चा रंगली आहे.
आता अभिनेत्रीने संन्यास स्वीकारला आहे. पण एक काळ असा होता जेव्हा सर्वत्र फक्त आणि फक्त ममता कुलकर्णी हिचा बोलबाला होता. बॉलिवूडमध्ये सक्रिय असताना अभिनेत्रीने ‘अशांत’, ‘आशिक आवारा’, ‘करण अर्जुन’ आणि ‘वक़्त हमारा है’ या सिनेमांमध्ये काम केलं. अभिनेत्रीवे 1992 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तिरंगा’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आजही अभिनेत्री कोणत्या म कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.