मुसलमानांवर माझे प्रेम आहे, मला दररोज पाकिस्तानमधून…; ममता कुलकर्णीचा मोठा खुलासा

ममता कुलकर्णीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती पाकिस्तान आणि मुसलमानांविषयी बोलताना दिसत आहे.

मुसलमानांवर माझे प्रेम आहे, मला दररोज पाकिस्तानमधून...; ममता कुलकर्णीचा मोठा खुलासा
Mamta Kulkarni
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: May 30, 2025 | 5:54 PM

प्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णी हिने संन्यास घेतला. अध्यात्माच्या मार्गाला लागलेली ममता महामंडलेश्वर झाली. पण तिला महामंडलेश्वर पद दिल्याने किन्नर आखाड्यात वाद झाला आणि त्या वादातून तिने हे पद सोडलं होतं. पण नंतर ममताने पुन्हा एकदा महामंडलेश्वर पद स्वीकारलं आता अभिनेत्री ममता कुलकर्णी साध्वी बनली आहे. सध्या ती तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत आहे. अलीकडेच तिने पाकिस्तान आणि मुस्लिमांबाबत एक मोठं वक्तव्य केलं. अभिनेत्री म्हणाली, “पाकिस्तानमधून तिच्यासाठी दररोज 50 पत्रं यायची.”

“मुस्लिमांबद्दल माझ्या मनात खूप प्रेम आहे”

काही दिवसांपूर्वी ममता दिल्लीला गेली होती. तिथे तिने एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. “मुस्लिमांसाठी माझ्या मनात खूप प्रेम आहे. त्यांनी मला खूप प्रेम दिलं आहे. विशेषतः दुबईमध्ये, जिथे माझी आध्यात्मिक साधना 25 वर्षे चालली होती. या काळात मला तिथे खूप शांती आणि प्रेम मिळालं” असे ममता म्हणाली.

वाचा: या राशींचे नशीब फळफळणार, 2025मध्ये मिळणार यश! बाबा वेंगाचे ते भाकित खरं ठरणार का?

पाकिस्तानमधून ममता कुलकर्णीला दररोज पत्रं मिळायची

ममता कुलकर्णी पुढे म्हणाली, “जेव्हा मी बॉलिवूडची सुपरस्टार होते, तेव्हा मला पाकिस्तानमधून एका दिवसात पन्नास पत्रं मिळायची. त्यामुळे होय, माझ्या मनात मुस्लिमांसाठी खूप प्रेम आहे. पण माझ्या मनात दहशतवाद्यांसाठी कोणतंही प्रेम नाही.” भारत-पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर ममताचं हे वक्तव्य आता खूप चर्चेत आहे.

भारत-पाकिस्तानमधील तणाव का आहे?

गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव आहे. हा तणाव तेव्हा सुरू झाला जेव्हा जम्मूच्या पहलगाममध्ये काही दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांना लक्ष्य केलं होतं. त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरने प्रत्यूतर दिलं. या कारवाईत त्यांनी पाकिस्तानातील नऊ दहशतवादी ठिकाणं पूर्णपणे उद्ध्वस्त केली. या ऑपरेशननंतर पाकिस्ताननेही भारतावर अनेक अयशस्वी हल्ले केले होते.