2004 मध्ये मराठमोळं गाणं ठरलं सुपर-डुपर हिट, तेंव्हापासून 2026पर्यंत तरुणाईच्या ओठांवर; कायम आहे तीच जादू!
2004 मध्ये मराठी चित्रपटांनाही भरभराट येऊ लागलेली. यावर्षी एक भारी सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमानं लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. याच सिनेमातील एक गाणंही अत्यंत लोकप्रिय आहे. आजही ते ऐकलं जातं.

संगीत विश्वात काही गाणी अशी असतात, जी रिलीज झाल्यानंतर काळानुरूप जुनी होत नाहीत, तर जसजशी वर्षे लोटतात तसतशी ती अधिकच समृद्ध आणि जवळची वाटू लागतात. २००४ मध्ये रिलीज झालेला केदार शिंदेंचा अगं बाई अरेच्चा! हा सिनेमा असो किंवा त्यातील विनोद असो, प्रेक्षकांच्या मनात त्याचे वेगळे स्थान आहे. याच चित्रपटातील ‘मन उधाण वाऱ्याचे’ हे गाणं म्हणजे मराठी रसिकांसाठी एक भावनिक प्रवास आहे, जो दोन दशके उलटून गेल्यानंतरही रसिकांच्या ओठांवर आणि मोबाईलच्या प्ले-लिस्टमध्ये कायम आहे.
मनाचे कोपरे उलगडणारे शब्द अन् जादूई आवाज
प्रेमात पडल्यावर माणसाच्या मनात चाललेला विचारांचा कोलाहल, हुरहूर आणि व्यक्त न करता येणाऱ्या भावनांना अचूक शब्दांत मांडण्याचे कसब गीतकार गुरु ठाकूर यांनी या गाण्यातून साधले आहे. त्यातच संगीतकार जोडी अजय-अतुल यांनी रचलेली अत्यंत चपखव चाल आणि त्याला शंकर महादेवन यांनी आपल्या भारदस्त पण तितक्याच संवेदनशील आवाजात दिलेला न्याय, या दिग्गज जोडीने या गाण्याला अजरामर करून सोडले आहे. हे गाणं ऐकताना केवळ कान तृप्त होत नाहीत, तर मनाचा प्रत्येक कोपराही आनंदून जातो.
आजच्या डिजिटल युगातही अफाट क्रेझ
आजच्या बदलत्या काळात अनेक नवीन गाणी येतात आणि काही दिवसांतच विस्मृतीत जातात. मात्र, ‘मन उधाण वाऱ्याचे’ या गाण्याची जादू आजच्या तरुणाईपासून ते जुन्या पिढीपर्यंत सर्वांमध्ये कायम आहे. व्हॉट्सॲप स्टेटस असो, इन्स्टाग्राम रील्स असोत किंवा एकांतात बसून शांतपणे ऐकण्याची प्लेलिस्ट असो, हे गाणं आजही तितक्याच आपुलकीने ऐकले जाते. जुन्या आठवणींना उजाळा देणारी ही कलाकृती मराठी संगीताचा एक सोनेरी अध्याय ठरली आहे, ज्याची सर आजच्या कोणत्याही गाण्याला येऊ शकत नाही.
गाण्याचे बोल
मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते
नात्यांच्या बंधात धुंद मोहरते
[मन उधाण वा-याचे गुज पावसाचे
का होते बेभान कसे गहिवरते
मन उधाण वा-याचे……
तनाना तानानानानानानानानाना उ होहोहो….
आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते
हुरहुरत्या सांजेला कधी एकटेच झुलते
सावरते बावरते झडते अडखळते का पडते
कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते
मन तरंग होवून पाण्यावरती फिरते
अन क्षणात फिरुनी आभाळाला भिडते
मन उधाण वा-याचे गुज पावसाचे
का होते बेभान कसे गहिवरते
मन उधाण वा-याचे……
रुणझूणते गुणगुणते कधी गुंतते हरवते
कधी गही-या डोळ्यांच्या डोहात पार बुडते
तळमळते सारखे भाबडे नकळत का भरकटते
कधी मोहाच्या चार क्षणांना मन हे वेडे भुलते
जाणते जरी हे पुन्हा पुन्हा का चुकते
भाबडे तरी भासांच्या मागुनी पळते
[मन उधाण वा-याचे गुज पावसाचे
का होते बेभान कसे गहिवरते
मन उधाण वा-याचे……