मी कुटुंबाचे नाव खराब करेन; मनोज तिवारीची मुलगी हे काय बोलली? सलमानच्या बोलण्यावर चिडली

मनोज तिवारी यांच्या मुलीने रीती तिवारी पहिल्या वीकेंड का वार एपिसोडमध्ये खूप भावुक होताना दिसली. त्यांनी सांगितले की वडिलांमुळे त्या नेहमीच खूप प्रेशरमध्ये राहिल्या आहेत. त्या खुलेपणाने आपले जीवन जगू शकल्या नाहीत.

मी कुटुंबाचे नाव खराब करेन; मनोज तिवारीची मुलगी हे काय बोलली? सलमानच्या बोलण्यावर चिडली
Riti tiwari
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Sep 14, 2026 | 11:11 AM

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो म्हणून बिग बॉस पाहिला जातो. बिग बॉसचा 20 वा सिझन सुरु आहे. भोजपुरी अभिनेते आणि खासदार मनोज तिवारी यांची मुलगी रीती तिवारी सध्या सलमान खानच्या या शोमध्ये दिसत आहे. पहिल्या वीकेंड का वारमध्ये रीती खूप भावुक झाली. तिने आपल्या मनात दडलेले दुःख सर्वांसमोर व्यक्त केला. तिने सांगितले की तिच्या वडिलांच्या लोकप्रियतेमुळे तिला आयुष्यात अनेकदा मनातील इच्छा माराव्या लागल्या होत्या. तसेच सलमान खानने रीतीची प्रशंसा देखील केली.

खरं तर, वीकेंड का वारमध्ये सलमान खानने रीती तिवारीला सल्ला दिला की तिला गेममध्ये जास्त सतर्क राहण्याची गरज आहे. आपल्या वडिलांची ओळख न वापरता स्वतःची वेगळी ओळख निर्माण केल्याबद्दल सलमान यांनी रीतीची प्रशंसाही केली. सलमान यांच्याकडून आपली प्रशंसा ऐकून रीती खूप भावुक झाली. तिच्या डोळ्यांतून अश्रू येऊ लागले. पण सलमान खान गेल्यानंतर रीतीला रडू कोसळले. घरच्यांनी विचारल्यावर तिने सांगितले की तिला खूप जड वाटत आहेत, कारण वडिलांमुळे नेहमीच ती खूप प्रेशरमध्ये राहिली आहे.

काय म्हणाली रिती?

‘माझ्या वडिलांच्या ओळखीमुळे माझ्यासोबत एक मोठे नाव जोडले गेले आहे. ज्या दिवसापासून मी जन्माला आले, मला सांगितले गेले की तू त्यांची मुलगी आहेस, नीट बसा, छान हसा, असं का बोललात, असं का केलत. बाहेर जाल तर असं करा, काही बोलत असाल तर नीट विचार करा. पण मी तर कोणीतरी वेगळी बनले आहे. पण मी तर काहीतरी वेगळी आहे ना… माझ्याकडे तो हक्क आहे ना?’ असे रीती म्हणाली.

“वर्षानुवर्षे ओझ्याखाली दबली गेली आहे”

रीती म्हणाली की ती वर्षानुवर्षे या ओझ्याखाली दबली गेली आहे. ती रडत पुढे म्हणाली, मी ही गोष्ट आपल्या आत इतक्या खोलवर रुजवून घेतली आहे. आयुष्यात पहिल्यांदा मला वाटत आहे की कोणी माझ्यात ते पाहत आहे, जे मी आहे. कधीकधी मन जड होते. मी अशी व्यक्ती नाही की १० लोकांसमोर रडू लागेल.

रीती रडत म्हणाली की, मला वाटत आहे की मी खरे बनून आपल्या कुटुंबाचे नाव खराब करेन. तुम्हाला कळतंय ना? मी अशा कुटुंबातून येते की ज्या दिवसापासून मी जन्माला आले तेव्हापासून मला मनोज तिवारी यांची मुलगी म्हणूनच ओळखले गेले आहे. रीतीला पुन्हा घरच्यांनी शांत केले आणि समजावले. तरीही बिग बॉसमध्ये रीती तिवारीचा गेम तुम्हाला कसा वाटत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us