गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्ह आणि चर्चगेट.. 47 वर्षांपूर्वी अशी दिसायची मुंबई ! खऱ्याखुऱ्या पावसात भिजले अमिताभ बच्चन, हे गाणं आजही अविस्मरणीय

'मंजिल' चित्रपटातील गाणे मुंबईचा पाऊस, अमिताभ बच्चन आणि मौसमी चॅटर्जी यांच्या केमिस्ट्रीमुळे आजही अविस्मरणीय आहे. 47 वर्षांपूर्वीची जुनी मुंबई, गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्ह आणि पावसात भिजलेले रस्ते याचे सुंदर दर्शन या गाण्यातून घडतं. खऱ्याखुऱ्या पावसात शूट झालेल्या या गाण्यात त्या काळातील मुंबईचं विहंगम दृश्य दिसतं.

गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्ह आणि चर्चगेट.. 47 वर्षांपूर्वी अशी दिसायची मुंबई ! खऱ्याखुऱ्या पावसात भिजले अमिताभ बच्चन, हे गाणं आजही अविस्मरणीय
| Updated on: Oct 27, 2026 | 4:11 PM

मुंबईला स्वप्ननगरी असं म्हटलं जातं.. अनेक जणं मोठमोठी स्वप्न घेऊन या शहरात येतात आणि अथक मेहनतीने ती पूर्णही करतात. या शहरात काही अशी ठिकाणं आहेत जी या शहराचं सौंदर्य आणखी वाढवतात. त्याचसोबत रस्त्यांवर धावणाऱ्या डबल डेकर बस, मरीन ड्राइव्ह आणि रस्त्यांवर चालणारी माणसं आणि मुंबईचा पाऊस… विचार करा या सुंदर अशा प्रसंगात अमिताभ बच्चन आणि मौसमी चॅटर्जी जर पावसात भिजत मुंबईच्या रस्त्यांवर फिरताना दिसले तर कसा नजारा असेल ? आज आपण 1979 साली आलेल्या एका चित्रपटाच्या गाण्याबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यात मुंबईचं एवढं सुंदर चित्र दिसतं. 47 वर्षांपूर्वी मुंबई, तेव्हा कशी दिसायची, हे यातून सहज पहायला मिळतं. या गाण्यात मुंबईचं सौंदर्य आणि अमिताभ-मौसमी चॅटर्जी यांची लाजबाव केमिस्ट्री तर पाहण्यासारखी आहे. तब्बल 47 वर्ष उलटून गेल्यानंतरही हे गाणं फक्त त्याच्या संगीतामुळेची नव्हे तर मुंबईतील त्या काळच्या विहंगम दृश्यामुळे अविस्मरणीय ठरतं.

खऱ्याखुऱ्या पावसात झालं होतं शूटिंग

Loading...

आपण ज्या गाण्याबद्दल बोलत आहोत, ते म्हणजे ‘रिमझिम गिरे सावन’ .. 1979 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मंजिल’ चित्रपटातील हे गाणं खूप लोकप्रिय ठरलं. या गाण्याला आर. डी. बर्मन यांनी संगीत दिलं होतं, तर योगेश यांनी त्याचे बोल लिहिले. या गाण्याच्या दोन आवृत्त्या आहेत. एक किशोर कुमार यांच्या आवाजात, तर दुसरी लता मंगेशकर यांच्या आवाजात आहे. लता मंगेशकर यांच्या आवाजातील गाण्याचे चित्रीकरण मुंबईतील पावसात आणि रस्त्यांवर प्रत्यक्ष पाऊस सुरू असताना करण्यात आलं होतं. हे गाणे कोणत्याही स्टुडिओमध्ये शूट करण्यात आलं नाही. तर संपूर्ण गाण्याचे शूटिंग दोन दिवसांत पूर्ण करण्यात आले. पाऊस सुरू असेपर्यंत चित्रपटाचे शूटिंग सुरूच ठेवण्यात आलं.

गाण्याचे बोल खालीलप्रमाणे –

रिमझिम गिरे सावन
सुलग सुलग जाए मन
भीगे आज इस मौसम में
लगी कैसी ये अगन
रिमझिम गिरे सावन
सुलग सुलग जाए मन
भीगे आज इस मौसम में
लगी कैसी ये अगन
रिमझिम गिरे सावन

गेटवे ऑफ इंडिया ते मरीन ड्राइव्ह पर्यंत दिसली जुनी मुंबई

या गाण्यात अमिताभ बच्चन आणि मौसमी चॅटर्जी एकमेकांचा हात धरून मुंबईच्या रस्त्यांवर फिरताना दिसतात. मरीन ड्राइव्ह, गेटवे ऑफ इंडिया आणि दक्षिण मुंबईतील रस्त्यांवर दोघेही पावसाचा आनंद घेताना दिसले. याशिवाय, गाण्यात ओव्हल मैदान आणि व्हिक्टोरिया टर्मिनस परिसरातील सुंदर दृश्येही दाखवण्यात आली आहेत. आजच्या काळात या ठिकाणी चित्रपटाचं शूटिंग करायचं असेल तर विविध परवानग्या घ्याव्या लागतात. मात्र, त्या काळात कोणतीही विशेष तयारी न करता या गाण्याचे चित्रीकरण करण्यात आलं होतं.

बासू चॅटर्जी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला ‘मंजिल’ हा चित्रपट 1979 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी अजय चंद्रा, तर मौसमी चॅटर्जी यांनी अरुणा खोसला ही व्यक्तिरेखा साकारली होती. त्यांच्यासोबत राकेश पांडे, सत्येन कप्पू, ए. के. हंगल आणि ललिता पवार यांसारखे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us