Chetan Vadnere : मला मिळालेले पुरस्कार मी भंगारात दिले, माझं ते स्वप्न नाही; मराठी अभिनेत्याचं बेधडक वक्तव्य

Marathi Actor : प्रसिद्ध मराठी अभिनेत्यानं पुरस्कारांबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.

| Updated on: Nov 23, 2026 | 8:20 PM
1 / 5
मराठी अभिनेता चेतन वडनेरेला 'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेमुळे प्रसिद्धी मिळाली. अशातच अभिनेता त्याच्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आला आहे. 'मला मिळालेले अवॉर्ड्स मी भंगारात दिले' असं अभिनेता म्हणाला आहे.

मराठी अभिनेता चेतन वडनेरेला 'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेमुळे प्रसिद्धी मिळाली. अशातच अभिनेता त्याच्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आला आहे. 'मला मिळालेले अवॉर्ड्स मी भंगारात दिले' असं अभिनेता म्हणाला आहे.

2 / 5

चेतन म्हणाला की, 'पुरस्कार सोहळ्यांना मी जात नाही. मला नॉमिनेशन्स असतात. माझा अवॉर्ड्सवर विश्वास नाहीये. प्रमुख अभिनेत्याचं नॉमिनेशन असूनही मी जात नाही. चॅनेलचा अवॉर्ड्सना जावं लागतं कॉन्ट्रॅक्टमध्ये आहे म्हणून. माझ्या घरी आतापर्यंत जे अवॉर्ड्स होते, शाळेत मिळालेले वगैरे. मी ते सगळे भंगारात दिलेत. त्याचा फोटो आहे माझ्याकडे. आई म्हणाली, अरे काय हे? चांगले मोमेन्टो होते मी ते सगळे तोडले आणि भंगारात टाकले.'

3 / 5

यामागचं कारण सांगत चेतन म्हणाला, 'कलाक्षेत्रात 2 आणि 2 चार हे गणित नाही. माझं काम तुला आवडत नाही पण त्याला आवडू शकतं. मग बक्षिस कशाच्या आधारावर देणार. तुझी पर्सनल चॉइस जर मी नसेन तर तू मला बक्षीस देणार नाही. पण याचा अर्थ ते वाईट आहे का, चुकीचं आहे का? गाण्यात तुझा सा लागला नाही लागला ते तिथेच कळतं अभिनयाबाबतीत तसं नाहीये.'

4 / 5

'तुला ब्रॅड पिटही आवडू शकतो आणि मकरंद अनासपुरेही आवडू शकतो. कदाचित दोघे तुला नाही आवडणार पण दोघे आपापल्या ठिकाणी श्रेष्ठच आहेत. तर यात बक्षीस तुम्ही कोणत्या क्रायटेरियावर देणार. सध्या अवॉर्ड्सला मोठं होण्याची गरज आहे. मोठी नावं असलेल्या मंडळींना अवॉर्ड दिली जातात. मग अवॉर्ड मोठा होतो. त्यामुळे मी त्या कार्यक्रमांना जातच नाही.'

5 / 5

'मी आमिर खान इतका मोठा नाहीये. पण मला नाही वाटत तर मला नकोय तो अवॉर्ड. माझं अजिबात स्वप्न नाहीये. ज्यात माझ्या घरात एक शोकेस असावं त्यात माझे अवॉर्ड असतील. लोकांना आवडलं ते माझं अवॉर्ड आहे.' असं चेतन शेवटी म्हणाला. स्वामी कृपा क्रिएशनला दिलेल्या मुलाखतीत चेतन बोलत होता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us