मराठी टीव्ही अभिनेत्याला पुण्यात बेड्या, अल्पवयीन तरुणीच्या विनयभंगाचा आरोप

राधा प्रेम रंगी रंगली, आम्ही दोघं राजा राणी यासारख्या मालिकांमध्ये झळकलेला मराठी अभिनेता मंदार कुलकर्णी याला अल्पवयीन तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

मराठी टीव्ही अभिनेत्याला पुण्यात बेड्या, अल्पवयीन तरुणीच्या विनयभंगाचा आरोप

पुणे : मराठी अभिनेता आणि दिग्दर्शक मंदार कुलकर्णी (Mandar Kulkarni) याला अटक करण्यात आली आहे. फोटोशूटच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग (Molestation) केल्याप्रकरणी मंदारला पुण्यात बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. मंदार कुलकर्णीची भूमिका असलेल्या ‘आम्ही दोघं राजा राणी’, ‘राधा प्रेम रंगी रंगली’ यासारख्या मालिका गाजल्या आहेत.

मंदारने बिकिनी फोटोशूट करण्यासाठी जबरदस्ती केल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे. पुण्यातील डेक्कन जिमखाना पोलिस ठाण्यात 23 ऑगस्टला तिने तक्रार दाखल केली होती.

मंदार कुलकर्णी आणि तक्रारदार तरुणीची भेट जानेवारी महिन्यात एका नाट्य शिबीरात झाली होती. ओळखीचं रुपांतर मैत्रीमध्ये झालं. त्यानंतर मंदारने तिला टीव्ही मालिकेच्या ऑडिशनसाठी फोटोशूट करायचं आहे, असं सांगून आपल्या घरी बोलावलं.

तरुणी घरी आल्यानंतर मंदारने तिला पाच ड्रेस ट्राय करण्यासाठी दिले. काही कपड्यांवर फोटोशूट झाल्यानंतर मंदारने तिला बिकिनी घालण्यासाठी दिली. मात्र बिकिनीत फोटोशूट करण्यास आपण कम्फर्टेबल नसल्याचं सांगत तिने नकार दिला.

मंदारने आपल्याला जबरदस्ती अर्धनग्नावस्थेत फोटोशूट करण्यास भाग पाडलं आणि विनयभंग केला, असा आरोप तरुणीने तक्रारीत केला आहे. फोटोशूट झाल्यानंतर याविषयी घरात कोणाला सांगू नकोस अशी धमकीही त्याने दिल्याचा दावा तरुणीने केला आहे.

मंदारच्या घरातून बाहेर पडल्यानंतर तरुणीने घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितला. तिच्या आईने मंदार कुलकर्णीविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर कलम 345 अंतर्गत गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याला गजाआड केलं.

34 वर्षीय मंदार कुलकर्णी पुण्यातील शनिवार पेठेत राहतो. त्याने राधा प्रेम रंगी रंगली, आम्ही दोघं राजा राणी, शेजारी शेजारी पक्के शेजारी अशा मालिकांमध्ये भूमिका साकारली होती. तसंच त्याने ‘लग्नबंबाळ’ या नाटकातही भूमिका केली होती.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *