मुंबईत मराठी माणसाच्या मराठीची वाट…, हिंदी सक्तीवर वैभव मांगलेंची परखड भूमिका

राज्यात पेटलाय हिंदी भाषा सक्तीचा विषय, ठाकरे बंधूंच्या मोर्चाची चर्चा सुरु असताना अभिनेते वैभव मांगलेंची परखड भूमिका, म्हणाले, 'मुंबईत मराठी माणसाच्या मराठीची वाट...'

मुंबईत मराठी माणसाच्या मराठीची वाट..., हिंदी सक्तीवर वैभव मांगलेंची  परखड भूमिका
फाईल फोटो
| Updated on: Jun 29, 2025 | 9:43 AM

राज्यात पहिल्या इयत्तेपासून तिसऱ्या भाषेचं शिक्षण अनिवार्य करतानाच ही भाषा हिंदीच राहील, असं शुद्धिपत्रक राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने जारी केलं. ज्यामुळे राज्यात हिंदी सक्तीवरून वातावरण तापलं आहे. हिंदी भाषा सक्तीची करू नये, मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय मागे घ्यावा… अशी प्रकिक्रिया सर्वच स्तरातून होत आहे. हिंदी सक्ती नसावी… साठी कलाक्षेत्रातून प्रतिक्रिया समोर येत आहे. अभिनेते वैभव मागले यांनी देखील हिंदी सक्तीवर सडेतोड भूमिका व्यक्त केली आहे.

वैभव मांगले म्हणाले, ‘उर्वरीत महाराष्ट्राचं मला माहीत नाही. पण मुंबईत मराठी माणसाच्या मराठीची वाट लागलेली आहे … कामाच्या ठिकाणी सतत हिंदी किंवा इंग्रजी बोलाव लागत हा एक भाग झाला आहे…

पुढे वैभव मांगले म्हणाले, ‘ दुसरं म्हणजे, आपल्या आपल्यातसुद्धा त्यांना मराठी बोलायची लाज वाटते. आपली मुलं चांगल मराठी बोलायचं विसरून गेली आहेत. त्यात हिंदीची सक्ती केली तर संपलच सगळं मातृभाषेची (मुळात आई मराठी बोलत असले तर) भिकारणीची अवस्था होईल… असं देखील वैभव मांगले म्हणाले.

हिंदी सक्ती निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र

सध्या राज्यात हिंदी भाषेची सक्ती विषय पेटला आहे. अनेक राजकीय नेत्यांनी देखील हिंदी भाषा सक्तीचा विरोध केला आहे. तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिसऱ्या भाषेची सक्ती पहिलीपासूनच नाको म्हणून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे एकत्र येणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र येणार असल्याची चर्चा सुरु आहे. त्यातच आता राज्य सरकारच्या हिंदी भाषेची सक्ती करण्याच्या निर्णयाविरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मोर्चा काढणार आहेत. 5 जुलै रोजी भव्य मोर्चाचं आयोजन केलं आहे. या मोर्चाला अनेकांनी पाठिंबा देखील दिला आहे.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मोर्चा काढणार अशी घोषणा केल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ठाकरे बंधूंचा एकत्र फोटो शेअर करत हिंदी सक्तीविरोधात एकत्र मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली.