लेक मार खातेय हे कळतं तेव्हा…., हुंडाबळी आणि महाराजांच्या शिकवणीबद्दल अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य
एकदा मुलगी दिली की, ती परक्याचं धन वैगरे..., मुलींवर होणाऱ्या अन्यायावर अभिनेत्री स्पष्ट वक्तव्य, हुंडाबळी आणि महाराजांनी दिलेल्या शिकणीबद्दल म्हणाली...

आपल्याकडे एक परंपरा आहे की एकदा मुलगी दिली की, ती परक्याचं धन वैगरे… नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री नेहा शितोळे हिने हुंडाबळीबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. आपल्या मुलीवर अन्याय होत आहे हे कळल्यानंतर तात्काळ निर्णय घेतल्यानंतर मुलींवर होणारे अन्याय कमी होतील असं अभिनेत्रीचं म्हणणं आहे. एवढंच नाही तर, हुंडाबळी बद्दल स्वतःचं मत व्यक्त करत असताना अभिनेत्रीने महाराजांनी दिलेल्या शिकणीबद्दल मोठं वक्तव्य केलं. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.
आजच्या काळात सुद्धा हुंडाबळी सारख्या घटना घडत आहेत.. असा प्रश्न अभिनेत्रीला विचारण्यात आला. यावर नेहा म्हणाली, ‘पहिल्यांदा जेव्हा तुम्हाला तुमच्या मुलीच्या काळे – निळे अंगावर वण दिसतात किंवा ती मार खात आहे, हे तुम्हाला कळतं. घरी येऊन ती रडतेय तुमच्या समोर आणि मुळात पहिल्यांदा जेव्हा तुमची मुलगी मार खाऊन घरी येते तेव्हा किला परत त्या असुरक्षित वातावरणात ढकललंच नाही पाहिजे. अशा वेळी तुमच्यातलं उसळतं रक्त कुठे जातं? असा प्रश्न नेहाने उपस्थित केला.
इतिहासाबद्दल अभिनेत्री नेहा म्हणाली…
‘ज्या पद्धतीचा इतिहास आपण सांगतो… छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आपण सांगतो, ज्यांनी कायम स्त्रियांना मानाची वागणूक देण्याचीच शिकवण आपल्याला आतापर्यंत दिली आहे. आपल्याकडे एक परंपरा आहे की एकदा मुलगी दिली की, ती परक्याचं धन वैगरे… पण दुसरी देखील एक परंपरा आहे, ज्याने आपल्याला मुलीचं रक्षण करायला सांगितलं आहे. आपल्या मुलीला पाठीशी उभं राहायला शिकवलं आहे.’
अभिनेत्री पुढे म्हणाली, ‘हंबीरराव मोहित्यांसारखा माणूस आहे ज्यांनी लहानपणापासून आपल्या मुलीला शस्त्रविद्येचं शिक्षण दिलं आणि सक्षम केलं की नंतर ती स्वराज्याचा सांभाळ करु शकेल.’ सध्या नेहा हिचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
सांगायचं झालं तर, पुण्यातील मुळशी येथील वैष्णवी हगवणे या महिलेने सासरच्या लोकांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. 16 मे रोजी घडलेल्या या घटनेने संपूर्ण देशात खळबळ माजली. सासरच्या जाचाला कंटाळलेल्या वैष्णवीने अवघ्या नऊ महिन्याच्या बाळाला सोडून स्वतःचं आयुष्य संपवलं. मुलीने उचलल्या पाऊलानंतर वैष्णवीच्या वडिलांनी पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे, नणंद करिश्मा हगवणे, सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत केल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्यांना अटक देखील केली. सध्या याप्रकरणी तपास सुरु आहे.
