
मराठी मनोरंजनसृष्टीतील ज्येष्ठ आणि लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या नारकर या त्यांच्या दमदार अभिनयामुळे प्रेक्षकांमध्ये कायम चर्चेत असतात.

अनेक गाजलेल्या मालिका, नाटके आणि चित्रपटांतून त्यांनी साकारलेल्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. अभिनयाबरोबरच सोशल मीडियावर त्या खूप सक्रिय असतात.

अशातच त्यांनी एक साडीमधील एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या लुकमध्ये हटके पोज दिल्या आहेत. त्यासोबत त्यांनी अभी ना जाओ हे गाणं लावलं आहे.

या फोटोमध्ये ऐश्वर्या नारकर यांनी मरून रंगाची, हातमागावर विणलेली माहेश्वरी साडी नेसली आहे. साधेपणा आणि अभिजातपणा यांचा सुंदर संगम या लुकमध्ये पाहायला मिळत आहे.

पारंपरिक साडीमध्येही त्यांनी आधुनिक टच दिला आहे. त्यांच्या या लुकवर चाहत्यांनी भरभरून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

गेल्या अनेक दशकांपासून त्या प्रेक्षकांचे सातत्याने मनोरंजन करत आहेत. वयाच्या 51 व्या वर्षीही त्यांचा फिटनेस आणि सौंदर्य अनेकांना थक्क करत आहे.