Maitthily Jawkar : आम्ही बेघर होणार आहोत…, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची झालीये बिकट अवस्था, सांगितली आपबिती

Maitthily Jawkar : मराठी अभिनेत्री मैथिली जावकरनं अनेक कलाकृतींमध्ये मुख्य भूमिका साकारल्या. मात्र, आता अभिनेत्रीवर बेघर व्हायची वेळ आली आहे. याबद्दल तिनं नुकत्याच एका मुलाखतीत सांगितलंय.

Maitthily Jawkar : आम्ही बेघर होणार आहोत..., सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची झालीये बिकट अवस्था, सांगितली आपबिती
| Updated on: Oct 04, 2026 | 6:53 PM

बालकलाकार ते मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री मैथिली जावकर अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या संकटाला सामोरी जात आहे. दामिनी, वादळवाट, आई मला माफ कर, अशा कितीतरी कलाकृतीतून मैथिली जावकरनं मुख्य भूमिका साकारल्या. गेली 35 वर्ष अभिनेत्री इंडस्ट्रीत सक्रिय आहे. मात्र आता घराच्या केसमुळे ती आर्थिक संकटात सापडल्या आहेत. ज्या घरात अभिनेत्री 40 वर्ष राहिली त्याच घरातून तिला बाहेर पडावं लागत आहे. याबद्दल मैथिलीनं एका मुलाखतीत सांगितलंय.

मैथिलीच्या वडिलांनी 1986 साली घर घेतलं होतं. आतापर्यंत या घरावर तब्बल 9 वेळा केस दाखल झाल्या आहेत . वकील योग्य न मिळाल्यानं, तो तारखेवर हजर न राहिल्यानं ते केस हरले. तीच केस पुढे हायकोर्टात समोरून लढवली गेली तोपर्यंत त्यांना वकीलाकडून कुठलीच माहिती दिली गेली नाही. वडिलांनी 1.38 लाखाला मैथिलीच्या वडिलांनी 1986 नंतर हाऊसिंग लोन घेतलं नव्हतं, त्यांच्या निवृत्तीनंतर फंडाचे पैसे भरून त्यांनी हे घर रोख खरेदी केलं होतं . पूर्ण पैसे भरूनही रिकव्हरी भरली नाही म्हणून 2007 साली पुन्हा 1.33 लाख रुपये भरून दुसऱ्यांदा तेच घर विकत घेतलं. त्यामुळे हे घर त्यांना 2 लाख 71 हजाराला पडलं.

Loading...

मैथिली जावकरनं सांगितला प्रसंग

याबद्दल बोलताना मैथिली म्हणाली की, ‘माझ्या घराची केस 1999 पासून हायकोर्टात पेंडिंग होती, ती नंतर 2023 ला बोर्डावर आली. माझं सिनेमाचं शूटिंग, मी एक नाटकही प्रोड्युस आणि डायरेक्ट केलेलं. त्या नाटकाच्याही तालमी सुरू होत्या. त्यामुळे माझं कोर्टाकडे दुर्लक्ष झालं. त्यामुळे गडबड झाली. माझा वकील चार तारखा गैरहजर होता. शेवटच्या तारखेला इन्टिमेशन दिलेलं, तरी ते हजर राहिले नाही. त्यांनी मलाही कळवलं नाही.’

‘माझ्या वडिलांनी 1986 मध्ये 1 लाख 38 हजारांना हे घर जे विकत घेतलं, त्याऐवजी एखादी झोपडी घेतली असती तरी आम्हाला एसआरएमध्ये घर मिळालं असतं. पण, मी आणि माझं कुटुंब 40 वर्ष या घरात राहतोय आणि आज आम्ही बेघर होणार आहोत. कुठे जायचं? माझी आई 85 वर्षांची आहे, तिला घेऊन कुठे जाऊ? माझ्या वडिलांनी हे घर दोन वेळा विकत घेतलंय. एक दिवस कोणीतरी भलतीच व्यक्ती आमच्या घरी राहायला आली. सेक्रेटरीकडे गेल्यावर त्यांनीही अरेरावी केली. आई–बाबांनी नंतर कोर्टात केस टाकली. त्यानंतर अनेक वर्षांनी आम्ही तिथे राहत होतो, हे सिद्ध झालं. पण, त्यानंतरही कोर्ट केस सुरू राहिल्या. आम्ही बेघर होणार आहोत. त्यामुळे माझा सिनेमाही अर्धवट राहिलाय. दोन अडीज वर्ष मी काही कामच केलं नाहीये. आईचे दागिने गहाण ठेऊन आधी वकिलांच्या फीज दिल्या. पण, आता जर तारीख लागली तर वकिलांची फी देण्यासाठीही आता पैसे नाहीत.’ असं मैथिली शेवटी म्हणाली. ‘लोकमत फिल्मी‘ला दिलेल्या मुलाखतीत मैथिली बोलत होती.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us