AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुला फाडायचं कसं…; अभिनेत्री माधुरी पवारला आला ‘कास्टिंग काऊच’चा विचित्र अनुभव

Actress Madhuri Pawar on Casting couch : अभिनेत्री माधुरी पवार बिंधास्त बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे. ती वेगवेगळ्या विषयांवर ती परखड मतं मांडत असते. आताही तिने कास्टिंग काऊचवर आपलं मत मांडलं आहे. माधुरीने एका मुलाखतीदरम्यान तिच्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला आहे. वाचा...

तुला फाडायचं कसं...; अभिनेत्री माधुरी पवारला आला 'कास्टिंग काऊच'चा विचित्र अनुभव
माधुरी पवारImage Credit source: Instagram
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Jun 22, 2024 | 6:24 PM
Share

बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीत अनेक अभिनेत्रींना ‘कास्टिंग काऊच’चा अनुभव येतो. कलाविश्वात काम देतो या नावाखाली अनेक अभिनेत्रींना कॉम्प्रमाईज करण्याबाबत विचारलं जातं. असाच काहीसा अनुभव अभिनेत्री माधुरी पवार हिला देखील आला. ‘अल्याड पल्याड’ या सिनेमाच्या निमित्त एका मुलाखतीदरम्यान माधुरीने तिला आलेला अनुभव सांगितला. एकदा माधुरीला देखील असा फोन आला होता. त्या व्यक्तीला ‘साताऱ्याच्या शिव्या’चा अनुभव दिला, असं माधुरीने सांगितलं.

तो फोन आला अन्…

मला एकदा एक फोन आला. मला वाटलं असेल कुणाचा फोन… तर मग मी तो फोन घेतला. तेव्हा लक्षात आलं की हा काही तरी वेगळा फोन आहे. त्याने मला विचारलं की मॅडम तुमची डेट मिळेल का? मला तुम्हाला भेटायचं आहे. मग मी त्याला म्हटलं की, या मग आमच्या घरी… तर त्याचं म्हणणं होतं की एकट्यात भेटायचं आहे. पण मी म्हटलं की एकटीलाच का भेटायचंय तुला… तर म्हणे भेटतात की, मराठी हिरोईन भेटतातच की… ही भेटते ती भेटते… त्याने नावं घ्यायला सुरुवात केली, असं माधुरीने सांगितलं.

“त्याला बरोबर सांगितलं की…”

मग मला लक्षात आलं की हा काय प्रकार आहे. तर मग मी म्हटलं ठीक आहे भेटते मी तुला… पण तू आता कुठे आहेस? तर तो म्हणे इथे-इथे आहे. तर त्याला म्हटलं की तू तिथंच थांब. तुझी कशी फाडायची ते मी तिथं येऊन तुला मी सांगते… मग माझी डेट कशी असते ते तुला कळेल. मी गेले आणि त्याला बरोबर सांगितलं की डेट काय असतं ते…, असं माधुरी पवार हिने या मुलाखतीत सांगितलं.

सोलापूर भागातील मुलगा आहे. त्याचं मी नाव नाही घेणार. पण आता परवाच्या दिवशी एका चांगल्या माणसाने मला फोन केला होता. तेव्हा म्हणे हा – हा व्यक्ती माझ्यासोबत आहे. मग तो मला म्हणे, मॅडम नमस्कार ओळखलंत का? तर मी म्हटलं चांगलीच ओळख आहे. फाडणाऱ्याची चांगलीच ओळख ठेवते मी…. तू चांगलाच लक्षात आहे. तर मग त्याने हो -हो केलं. तुमचं चांगलं चाललंय, असं म्हणाला. मी म्हटलं फोन त्या दुसऱ्या व्यक्तीकडे दे आणि त्याने दिला. त्यामुळे मला काही गोष्टी नाही खपत तर नाही खपत…, असं म्हणत माधुरी पवारने तिला आलेला कास्टिंग काऊचचा अनुभव सांगितला.

Follow Us
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी
जीव गेला तरी जमीन देणार नाही! शक्तीपीठ महामार्गाविरोधात 22 गाव...
जीव गेला तरी जमीन देणार नाही! शक्तीपीठ महामार्गाविरोधात 22 गावांतील शेतकरी आक्रमक