AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शितलीचा येतोय नवा चित्रपट; ‘नेता गीता’ सिनेमातून शिवानी बावकर झळकणार मोठ्या पडद्यावर

Actress Shivani Baokar Neta Geeta Movie : अभिनेत्री शिवानी बावकर हिचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेत्री शिवानी बावकर या सिनेमात प्रमुख भूमिकेत असणार आहे. येत्या 23 ऑगस्टपसून चित्रपटगृहात पाहायला मिळणार आहे. वाचा सविस्तर......

शितलीचा येतोय नवा चित्रपट; 'नेता गीता' सिनेमातून शिवानी बावकर झळकणार मोठ्या पडद्यावर
नेता गीता सिनेमाImage Credit source: tv9
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Jul 20, 2024 | 7:59 PM
Share

झी मराठीवरील ‘लागीर झालं जी’ मालिकेतील अभिनेत्री शिवानी बावकर लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. अभिनेत्री शिवानी बावकर हिचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कॉलेजच्या काळातलं राजकारण, त्यावेळची नेतागिरी हा रोचक काळ असतो. तारूण्यातली धमक दाखवण्याची ती एक संधी असते. कॉलेज जीवनातलं राजकारण ते प्रेम प्रकरण हा धमाल प्रवास नेता गीता या चित्रपटातून उलगडणार आहे. चित्रपटाचं पोस्टर लाँच करण्यात आलं असून, अभिनेत्री शिवानी बावकर चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकणार असून अभिनेता सुधांशू महेश बुडुख या चित्रपटाच्या माध्यमातून चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे.

सिनेमा कधी प्रदर्शित होणार?

सिम्बारिया फिल्म्सतर्फे ‘नेता गीता’ या चित्रपटाची निर्मिती आणि प्रस्तुती करण्यात येत आहे. सुधांशू महेश बुडुख यांनी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. शिवानी बावकर हिच्यासह सुधांशू बुडुख रोहित कोकाटे, अनिल नगरकर, विठ्ठल काले, अजय तापकिर, विराज अवचिते, सुहास जोशी, सुचेत गवई, विक्रांत धीवरे असे उत्तमोत्तम कलाकार या चित्रपटात आहेत. रोशन मारोडकर यांनी छायांकन, निरंजन पेडगावकर यांनी संगीत, सौमित्र धारासूरकर यांनी संकलन, तर संजीर हवालदार, धीरज भालेराव यांनी नृत्य दिग्दर्शनाची जबाबदारी निभावली आहे. ‘नेता गीता’ हा सिनेमा येत्या 23 ऑगस्टपासून जवळच्या चित्रपटगृहात पाहायला मिळणार आहे.

‘नेता गीता’ सिनेमाची गोष्ट काय?

कॉलेज जीवनात तरुणाईचा सळसळता उत्साह असतो. या उत्साहातच कॉलेजच्या निवडणुका लढवल्या जातात. अशाच एका निवडणुकीच्या निमित्ताने घडणारी मनोरंजक गोष्ट “नेता गीता” या चित्रपटातून उलगडणार आहे. भगवद्‌गीता हा प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ आहे जो आपल्या सर्वांना माहीत आहे. या चित्रपटातही याचा काहीसा अनुभव आपल्याला मिळणार आहे.

कॉलेजमधील प्रेमप्रकरण, मैत्रीचे समीकरण, राजकरण यासर्वांसोबतच गीतेचे प्रवचन आपल्याला अनुभवता येणार आहे. चित्रपटाच्या पोस्टरवरून कथानकातला ताजेपणा व्यक्त होत आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळेच नेता गीता प्रेक्षकांची पसंतीस उतरू शकतं.

Follow Us
विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते...
विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते नागपूरमध्ये AI लॅबचे भव्य उद्घाटन
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं...
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं आव्हान, थेट कोर्टात...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट म्हणाले, शिंदेंनी त्यांच्या नेत्यांना...
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या पुढाऱ्याने अखेर सांगितलंच
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता म्हणाला..
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील...
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील पवारांच्या नेत्याचा भाजपला पाठिंबा?
संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
Pune | संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा देशभराचं लक्ष वेधणार?
थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत...
Eknath Shinde | थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत खडाजंगी
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा...
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा भलामोठा फोटो पाहून राऊत संतापले