नाशिकमध्ये जन्म, मुंबईत फोटोग्राफीचं शिक्षण, जर्मनीत जाऊन सिनेमा शिकला, भारतात परतून पहिला सिनेमा बनवला, जाणून घ्या एका सिनेमावेड्या माणसाची गोष्ट

भारतीय सिनेमाचे जनक दादासाहेब फाळके यांचा जन्म नाशिकमध्ये झाला. तिथे प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी मुंबईत फोटोग्राफीचं शिक्षण पूर्ण केलं. नंतर जर्मनीत जाऊन सिनेमाचं शिक्षण घेतलं आणि भारतात परतून पहिला सिनेमा बनवला आज आपण त्यांच्याविषयी जाणून घेणार आहोत.

नाशिकमध्ये जन्म, मुंबईत फोटोग्राफीचं शिक्षण, जर्मनीत जाऊन सिनेमा शिकला, भारतात परतून पहिला सिनेमा बनवला, जाणून घ्या एका सिनेमावेड्या माणसाची गोष्ट
दादासाहेब फाळके
| Edited By: | Updated on: Feb 16, 2022 | 8:10 AM

आयेशा सय्यद, मुंबई : थिएटरमध्ये (Theater) जाऊन सिनेमा (Cinema) बघायला सगळ्यांनाच आवडतं… पण या थिएटरचा, सिनेमाचा इतिहास तुम्हाला माहित आहे का? पहिला सिनेमा कुणी तयार केला, सिनेमाचं नाव काय आणि पहिला भारतीय सिनेमा तयार करणारा अवलिया कोण? तुमच्या मनातील या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत. त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा…

भारतातील पहिला सिनेमा कुणी तयार केला?

भारतातील पहिला सिनेमा तयार केला दादासाहेब फाळके (Dadasaheb Falake) यांनी. नाव ऐकून तुमच्या मनात आलं ते अगदी खरंय. दादासाहेब फाळके हे मराठी होते. दादासाहेब मुळचे आपल्या नाशिकचे. त्यांचा आज 77 वा स्मृतीदिन आहे. त्यानिमित्त त्यांच्याविषयी जाणून घेऊयात…

दादासाहेबांचा जन्म आणि शिक्षण

दादासाहेब फाळके यांचं मूळनाव धुंडिराज गोविंद फाळके. त्यांचा जन्म नाशिकमध्ये झाला. त्यांचं बालपण नाशकातच गेलं. प्राथमिक शिक्षणही नाशिकमध्येच झालं. त्यानंतर ते मुंबईत आले. त्यांनी जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये नाटक आणि फोटोग्राफीचं शिक्षण घेतलं. पुढे सिनेमाचं शिक्षण घेण्यासाठी त्यांनी जर्मनी गाठली. तिथे त्यांनी सिनेमाचं तंत्र शिकलं आणि मग पुन्हा आपल्या मायदेशी परतून सिनेमा बनवण्यांचं ठरवलं.

भारतातील पहिला सिनेमा

साल होतं 1913. या क्रांतीकारी वर्षात भारतात पहिला सिनेमा तयार झाला. ज्याचं नाव होतं ‘हरिश्चंद्राची फॅक्ट्री’ आणि ही अजरामर कलाकृती करणाऱ्या अवलियाचं नाव होतं दादासाहेब फाळके. आजपासून 109 वर्षांपुर्वी हा सिनेमा तयार झाला. हा चित्रपट बनवण्यासाठी त्यांना 15 हजार रुपये खर्च आला होता.

दादासाहेब फाळके यांनी 19 वर्षांच्या त्यांच्या करिअरमध्ये 95 चित्रपट बनवले. 27 शॉर्ट फिल्म बनवल्या. ‘द लाईफ ऑफ क्रिस्ट’ हा सिनेमा त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला. हा सिनेमा तयार करण्यासाठी त्यांनी आपल्या पत्नीचे दागिने गहाण ठेवले होते. हा सिनेमा तयार करण्यासाठी त्यांना सहा महिने लागले.

सेतूबंधन हा त्यांचा शेवटचा मूकपट ठरला. 16 फेब्रुवारी 1944 त्यांचं निधन झालं.

दादासाहेब फाळके पुरस्कार

दादासाहेब फाळके यांच्या निधनानंतर 1969 साली भारत सरकारने त्यांच्या नावाने पुरस्कार देण्याची घोषणा केली. हा पुरस्कार मिळणाऱ्या सन्मानार्थीला सुवर्ण कमळ आणि 10 लाख रूपयांची रक्कम मिळते. पहिला दादासाहेब फाळके पुरस्कार देविका राणी यांना दिला गेला होता. पृथ्वीराज कपूर, सत्यजीत रे, व्ही शांताराम, लता मंगेशकर, दिलीप कुमार, आशा भोसले, देव आनंद, मन्ना डे या कलाकारांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

संबंधित बातम्या

अक्षयचा ‘रक्षाबंधन’ आणि आमिरचा ‘लाल सिंग चड्ढा’ यांच्यात टक्कर, कधी रिलीज होणार दोन्ही चित्रपट?

हृतिक रोशन-सबा आझादच्या अफेअरची चर्चा, सबाचा फोटो शेअर करत हृतिकची पूर्वपत्नी सुझैन खान म्हणाली…

कोणती साडी घ्यावी हे कळत नाही?, अंकिता लोखंडेचं ‘हे’ साडी कलेक्शन बघा, तुमचं कन्फ्युजन दूर होईल…