‘तो आला, बसला आणि गेला पण सर्वांच्या नजरा….’, देहविक्री करणाऱ्या महिलांची बाजू मांडणारी ‘शालू’ची पोस्ट!

| Updated on: Nov 08, 2021 | 10:33 AM

चित्रपटाच्या अनेक वर्षानंतर हीच ‘शालू’ अर्थात अभिनेत्री राजेश्वरी खरात तिच्या अनेक फोटोशूटमुळे चर्चेत आली. सध्या तिची अशीच एक पोस्ट सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. राजेश्वरीने ही पोस्ट देहविक्री करणाऱ्या महिलांच्यावतीने लिहिली आहे.

‘तो आला, बसला आणि गेला पण सर्वांच्या नजरा....’, देहविक्री करणाऱ्या महिलांची बाजू मांडणारी ‘शालू’ची पोस्ट!
Rajeshwari Kharat
Follow us on

मुंबई : नागराज मंजुळे यांच्या ‘फँड्री’ (Fandry) या चित्रपटाने आजवर अनेक पुरस्कार पटकावले. या चित्रपटाच्या कथेबरोबरच आणखी एक गोष्ट चर्चेत आली ती म्हणजे चित्रपटाची नायिका ‘शालू’. या चित्रपटात ‘शालू’चे पात्र अभिनेत्री राजेश्वरी खरात (Rajeshwari Kharat) हिने साकारले होते. या चित्रपटामुळे ‘शालू’ घराघरांत पोहोचली. चित्रपटाच्या अनेक वर्षानंतर हीच ‘शालू’ अर्थात अभिनेत्री राजेश्वरी खरात तिच्या अनेक फोटोशूटमुळे चर्चेत आली. सध्या तिची अशीच एक पोस्ट सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. राजेश्वरीने ही पोस्ट देहविक्री करणाऱ्या महिलांच्यावतीने लिहिली आहे.

‘कृपया थोडीफार दया त्यांच्यावरही करा ज्या आपल्या घरातील माता भगिनींसारखे आयुष्य कधीच जगू शकत नाहीत’, असे म्हणत तिने त्यांच्या भावना मांडल्या आहेत.

काय लिहिलंय ‘या’ पोस्टमध्ये?

समाजातील उपेक्षित असणाऱ्या या घटकाच्या भावना मांडताना राजेश्वरी खरात लिहिते, ‘तो आला, बसला, आणि गेला पण सर्वांच्या नजरा मात्र तिच्यावरच अडल्या.

स्त्री ने असे काम करने योग्य नवे परंतु पुरुषाने केलेले अतिउत्तम. काही काम धंदा का करीत नाहीस, फक्त पैश्यांसाठी लाचारीचे सोंग घेतीस. पण तुम्ही तुमच्या घरात धुणे भांड्याचे तरी काम देताल का एवढेच सांगा, आणि जरी काम दिले तरी त्या मागचा हेतू हा सर्वांनाच माहिती असतो.

गल्लीकडे येतांना तोंड लपवून येतात पण येतात मात्र नक्की. थोडावेळसाठी च खेळण घेतल्यासारखं आमची आबरू काढून घेता आणि मोबाईल च्या रिचार्ज पेक्षा कमी किम्मत देता. सर्वांना हे खेळण आयुष्यात एकदातरी पाहिजे असतच पण कोणी याला कायमच आपलं करून घेण्याची हिम्मत ठेवतात का? नाही, कारण वेश्या व्यवसाय करणारी स्त्री चारित्र्यहीन असते आणि बाकीचे सर्व अगदीच पवित्र असतात.

समाजात आणखी बर्‍याच काही गोष्टी वेश्ये बद्दल बोलल्या जातात पण कोणी मात्र कधी त्यांच्या हितात बोलत नाही, सर्वजण फक्तं ऐकुन मजा घेतात.

कृपया थोडीफार दया त्यांच्यावरही करा ज्या आपल्या घरातील माता भगिनींसारखे आयुष्य कधीच जगू शकत नाहीत.’

पाहा पोस्ट :

या पोस्टसह राजेश्वरीने स्वतःचा एक फोटोदेखील पोस्ट केला आहे. आपल्या या पोस्टच्या माध्यमातून अभिनेत्रीने समाजाला एक आवाहन केले आहे. आपल्याच समजतील असे काही घटक अनेक समस्यांना सामोरे जात असतात, अशावेळी त्यांना जरा आपण मदत करू शकत नसलो तर निदान त्यांना सन्मानाची वागणून द्यावी, असा संदेश तिने आपल्या या पोस्टमधून देण्याचा प्रयत्न केला आहे.

हेही वाचा :

Bigg Boss Marathi Season 3 Elimination | ‘ताईगिरी’ संपली, तृप्ती देसाई ‘बिग बॉस मराठी 3’मधून बाहेर, मांजरेकरही हळहळले

अभिनेत्री प्रणाली भालेरावची सोशल मीडियावर हवा…पाहा तिचे खास दिवाळीचे फोटोशूट!