Filmfare Marathi Awards: विराट मडकेला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार

एखाद्या कलाकारासाठी फिल्मफेअर पुरस्कार हे स्वप्न असतं. त्यात पदार्पणाचा पुरस्कार मिळाल्यावर तर वेगळीच ऊर्जा मिळते. मराठी फिल्मफेअर पुरस्कार सोहळा (Filmfare Marathi Awards 2021) नुकताच पार पडला. त्यात अभिनेता विराट मडकेला (Virat Madke) फिल्मफेअरचा पदार्पणाचा पुरस्कार मिळाला.

Filmfare Marathi Awards: विराट मडकेला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार
Virat Madke
Image Credit source: Tv9
| Edited By: | Updated on: Apr 03, 2022 | 11:08 AM

एखाद्या कलाकारासाठी फिल्मफेअर पुरस्कार हे स्वप्न असतं. त्यात पदार्पणाचा पुरस्कार मिळाल्यावर तर वेगळीच ऊर्जा मिळते. मराठी फिल्मफेअर पुरस्कार सोहळा (Filmfare Marathi Awards 2021) नुकताच पार पडला. त्यात अभिनेता विराट मडकेला (Virat Madke) फिल्मफेअरचा पदार्पणाचा पुरस्कार मिळाला. केसरी या सिनेमासाठी विराटला फिल्मफेअर २०२१चा पदार्पणाचा पुरस्कार मिळाला. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सर्वच कलाकार हे चांगल्या कामाच्या शोधात होते. काही चांगलं घडेल याची वाट पाहात होते आणि पुरस्कार सोहळ्यांनी कलाकारांना खरंच हुरुप आला आहे. ३१ मार्च रोजी मुंबईतील वांद्रे इथळ्या सेंट अँड्र्युजमध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडला. अभिनेता अमेय वाघ आणि सिद्धार्थ जाधव हे या सोहळ्याचे सूत्रसंचालक होते. विराटला सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार मिळाला असताना अभिनेत्रींमध्ये रेशम श्रीवर्धन हिने सर्वोत्कृष्ट पदार्पणातील पुरस्कारावर आपलं नाव कोरलं. रेशमने ‘जून’ या चित्रपटात भूमिका साकारली. (Filmfare Award)

विराट आपल्या या पहिल्या पुरस्काराबद्दल सांगतो, ”मला खरंतर सुरुवातीला विश्वासच बसला नाही, स्वप्नातही मी विचार केला नव्हता, हा असा दिवस असेल. पहिल्या सिनेमासाठी मिळालेली ही शाबासकीची थाप खूपच मोलाची आहे. मेहनतीचं चीज झालं असं वाटत आहे. दोन- तीन वर्षे केसरीसाठी मेहनत केली होती. त्यानंतर दोन वर्ष कोरोनामुळे कठिण काळ होता. पुढे काही चांगलं होईल का, असंच वाटत होतं. पण, एका बाजूला सिनेमाचं शूटिंग सुरु झालं आहे. तसंच आता फिल्मफेअरसारखा पुरस्कार मिळाला त्याने खूपच आनंद झाला आहे.”

विराटची इन्स्टा पोस्ट-

सुजय डहाके दिग्दर्शीत केसरी या सिनेमात विराट कुस्तीविराच्या भूमिकेत दिसून आला होता. विराटने या सिनेमासाठी खूप मेहनत घेतली होती. पैलवानाच्या शरीरयष्टीसाठी अत्यंत मेहनतीने, व्यायाम आणि आहाराच्या बळावर शरीर कमावले होते. सिनेमा रिलीज झाला तेव्हा विराटचे कौतुक झाले होते. आता पुरस्कार रुपाने त्याच्या कामावर शिक्कामोर्तब झाले आहे. विराट मडके सध्या एका मराठी -कन्नड सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे.

हेही वाचा:

Bade Achhe Lagte Hain 2: नकुल मेहता-दिशा परमारच्या ‘कंडोम’ सीनवर नेटकऱ्यांकडून प्रतिक्रियांचा पाऊस

Malaika Arora Accident: अपघातात मलायकाच्या कपाळाला दुखापत; प्रकृतीविषयी बहीण अमृताने दिली माहिती