‘नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा’, नव्या वर्षात महेश मांजरेकरांचा नवा मराठी चित्रपट!

आशय, विषय आणि सादरीकरण यांत नेहमी वैविध्य राखत महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांनी अनेक कलाकृती केल्या आहेत. त्यामुळे त्यांचा येणारा प्रत्येक चित्रपट हा प्रेक्षकांसाठी मेजवानीच असते. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या त्यांच्या ‘अंतिम’ या हिंदी चित्रपटाचं सिनेरसिकांकडून जोरदार कौतुक होतंय.

‘नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा’, नव्या वर्षात महेश मांजरेकरांचा नवा मराठी चित्रपट!
नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा
| Edited By: | Updated on: Dec 09, 2021 | 3:00 PM

मुंबई : आशय, विषय आणि सादरीकरण यांत नेहमी वैविध्य राखत महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांनी अनेक कलाकृती केल्या आहेत. त्यामुळे त्यांचा येणारा प्रत्येक चित्रपट हा प्रेक्षकांसाठी मेजवानीच असते. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या त्यांच्या ‘अंतिम’ या हिंदी चित्रपटाचं सिनेरसिकांकडून जोरदार कौतुक होतंय आणि आता नव्या वर्षात ते एक नवा मराठी चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ‘नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा’ असं वेगळं शीर्षक असलेला हा चित्रपट 21 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटाच्या पोस्टरने प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेलीय. चित्रपटाच्या पोस्टरनंतर नेमके कोणते कलाकार या चित्रपटात झळकणार? कोणती भूमिका साकारणार? याकडे रसिक प्रेक्षकांच्या नजरा आहेत. ज्येष्ठ नाटककार जयंत पवार यांनी लिहिलेल्या ‘वरनभात लोन्चा नि कोन नाय कोन्चा’ या कथेवर हा चित्रपट आधारित असून चित्रपटाची पटकथा व दिग्दर्शन अशी दुहेरी जबाबदारी महेश मांजरेकर यांनी सांभाळली आहे.

पाहा पोस्टर :

नवं वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येणार नवा चित्रपट!

अनेक लोकप्रिय हिंदी चित्रपटांची निर्मिती तसेच वितरण करणाऱ्या ‘एन एच स्टुडिओज’ या भारतातल्या अग्रगण्य निर्मिती संस्थेने ‘नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा’ या मराठी चित्रपटाच्या प्रस्तुतीची धुरा सांभाळली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ‘एन एच स्टुडिओज’ मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करीत आहेत. या चित्रपटाची निर्मिती नरेंद्र हिरावत व श्रेयांस हिरावत यांनी केली असून सहनिर्मिती ‘नाईंटीनाईन प्रोडक्शन्स’च्या विजय शिंदे यांनी केली आहे.

महेश मांजरेकर यांच्या आजवरच्या चित्रपटांची लोकप्रियता लक्षात घेता ‘नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा’ हा चित्रपट ही त्याला अपवाद नसेल. 21 जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

हेही वाचा :

Aarya Season 2 | माधुरी दीक्षितने सांगितली सुष्मिता सेनची सर्वात मोठी कमजोरी, समोर आणला ‘आर्याचा’ थरारक प्रवास

Happy Birthday Shatrughan Sinha | …जेव्हा होणाऱ्या सासूने शत्रुघ्न सिन्हांसोबत लेकीचं लग्न लावण्यास नकार दिला!

‘त्यांच्याशी हस्तांदोलन करताच तोंडून आपोआप जय हिंद निघायचं’, सीडीएस जनरल बिपिन रावत यांना बॉलिवूडची आदरांजली