निवेदिता सराफ यांच्याकडून लक्ष्मीकांत बेर्डेंच्या लेकाचं तोंड भरून कौतुक; म्हणाल्या, आज लक्ष्या…
Nivedita Saraf Shared Photos with Abhinay Berde : अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी अभिनय बेर्डे याच्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. यात त्यांनी अभिनयच्या कामाचं कौतुक केलं आहे. तसंच लक्ष्मीकांत बेर्डे यांचाही उल्लेख केला आहे. वाचा सविस्तर...

अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. लक्ष्मीकांत बेर्डे यांचा लेक अभिनय बेर्डे याचं त्यांनी तोंड भरून कौतुक केलं आहे. ‘आज्जी बाई जोरात’ नाटकात अभिनय सध्या काम करतो आहे. हे नाटक पाहण्यासाठी निवेदिता सराफ गेल्या होत्या. नाटक संपल्यानंतर निवेदिता सराफ यांनी अभिनयची भेट घेतली आणि या नाटकातील त्याच्या कामाचं निवेदिता सराफ यांनी कौतुक केलं. हा क्षण कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आणि हा फोटो निवेदिता यांनी इन्स्टाग्रामवर शेअर करत अभिनयाला शुभेच्छा दिल्यात. आज लक्ष्याची खूप आठवण आली. त्याला खूप अभिमान वाटला असता नक्कीच…, असं निवेदिता सराफ यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
निवेदिता सराफ यांची पोस्ट जशीच्या तशी
नुकतंच ‘आज्जीबाई जोरात’ हे नाटक बघायचा योग आला. नाटक खूप छान आहे. निर्मिती सावंत, पुष्कर श्रोत्री, मुग्धा गोडबोले, जयवंत वाडकर सगळ्यांनी खूप उत्तम कामं केली आहेत. लेखक दिग्दर्शक क्षितिज पटवर्धनचंही खूप कौतुक… पण सगळ्यात सुखद धक्का बसला तो अभिनय बेर्डेचं काम बघून… अभिनयने अप्रतिम काम केलंय. माझ्या बालमित्राची आमच्या लक्ष्याची खूप आठवण आली. त्याला खूप अभिमान वाटला असता नक्कीच…
View this post on Instagram
अभिनय बेर्डेच्या कामाचं कौतुक करणारी पोस्ट निवेदिता सराफ यांनी शेअर केली. यावर Thank you so much, means a lot!, अशी कमेंट अभिनयने केली आहे. तर इतर नेटकऱ्यांनीही या पोस्टवर कमेंट करत अभिनयच्या कामाचं कौतुक केलंय.
अशोक सराफ- निवेदिता सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे- प्रिया बेर्डे हे चौघेही जवळचे मित्र होते. या चौघींनी एकत्र काम देखील केलं आहे. मात्र 2004 ला लक्ष्मीकांत बेर्डे यांचं निधन झालं. त्यानंतर आता त्यांचा लेक अभिनय बेर्डे देखील सिनेसृष्टीत काम करतो आहे. ‘ती सध्या काय करते’ या सिनेमातून अभिनयने सिनेसृष्टीत पदार्पण केलं. आता सध्या तो ‘आज्जी बाई जोरात’ या नाटकात काम करत आहे. ‘आज्जी बाई जोरात’ हे पहिलं AI महाबालनाट्य आहे.
View this post on Instagram
