अनलॉक थिएटरच्या घोषणेनंतर मनोरंजनाची मेजवानी, प्रथमेश-रितिकाचा ‘डार्लिंग’ ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

| Updated on: Oct 04, 2021 | 1:49 PM

पुन्हा एकदा सिनेमागृहांचे दरवाजे उघडणार असल्याची सुखद बातमी येताच हिंदीसह मराठीतील प्रोडक्शन हाऊसेसची खऱ्या अर्थानं लगीनघाई म्हणजेच आगामी चित्रपट प्रदर्शित करण्याची लगबग सुरू झाली आहे.

अनलॉक थिएटरच्या घोषणेनंतर मनोरंजनाची मेजवानी, प्रथमेश-रितिकाचा डार्लिंग ‘या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला!
Darling
Follow us on

मुंबई : पुन्हा एकदा सिनेमागृहांचे दरवाजे उघडणार असल्याची सुखद बातमी येताच हिंदीसह मराठीतील प्रोडक्शन हाऊसेसची खऱ्या अर्थानं लगीनघाई म्हणजेच आगामी चित्रपट प्रदर्शित करण्याची लगबग सुरू झाली आहे. मागील वर्षभरापासून प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत असलेल्या चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा एका मागोमाग एक घोषित केल्या जात आहेत. मराठीतील बहुचर्चित चित्रपट असलेल्या ‘डार्लिंग’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. 7 हॉर्स एंटरटेनमेंट प्रा. लि., व्ही. पतके फिल्म्स आणि कथाकार मोशन पिक्चर्सच्या बॅनरअंतर्गत निर्माते अमित धुपे, अजय ठाकूर, व्ही. जे. शलाका आणि निखील खजिनदार यांची निर्मिती असलेला ‘डार्लिंग’ 10 डिसेंबर 2021 रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

‘डार्लिंग’ हा चित्रपट घोषणा आणि मुहूर्तापासून सिनेसृष्टीसोबतच प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. समीर आशा पाटील यांनी ‘डार्लिंग’चं दिग्दर्शन केलं आहे. समीर यांनी आजवर नेहमीच प्रवाहापेक्षा वेगळे विषय हाताळत मराठीच्या कक्षा रुंदावणाऱ्या चित्रपटांचं आपल्या अनोख्या शैलीत दिग्दर्शन केलं आहे. त्यामुळं अर्थातच ‘डार्लिंग’कडून सर्वांच्याच अपेक्षा वाढल्या आहेत.

उत्कंठा वाढवणारं कथानक

लॉकडाऊनमुळं लांबणीवर गेलेल्या ‘डार्लिंग’च्या ट्रेलरलाही प्रेक्षकांचा तूफान प्रतिसाद लाभला आहे. या चित्रपटातील ‘डार्लिंग तू…’ हे टायटल साँग असो वा, ‘ये है प्यार…’ हे रोमँटिक साँग असो… गीत-संगीताच्या माध्यमातूनही ‘डार्लिंग’नं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारं कथानक या चित्रपटाचा खरा नायक आहे.

पहिल्यांदाच झळकणार प्रथमेश-रितिकाची जोडी

या कथानकाला महाराष्ट्राचा लाडका अभिनेता अशी ओळख असलेल्या प्रथमेश परबची ऑनस्क्रीन नायकरूपी साथ लाभली आहे. या चित्रपटात प्रथमेशची ‘टकाटक’मधली जोडीदार रितीका श्रोत्री त्याची ‘डार्लिंग’ बनली आहे. या निमित्तानं प्रथमेश-रितीका ही जोडी पुन्हा एकदा रसिकांवर मोहिनी घालण्यासाठी सज्ज झाली असून, रसिकांना पुन्हा एकदा गाजलेल्या जोडीची आॅनस्क्रीन केमिस्ट्री अनुभवायला मिळणार आहे. या दोघांना ‘लागीरं झालं जी’ आणि ‘कारभारी लयभारी’ फेम निखिल चव्हाणची सुरेख साथ लाभल्याचं चित्रपटात पहायला मिळेल. थोडक्यात काय तर मनोरंजनाचं परीपूर्ण पॅकेज असलेला ‘डार्लिंग’ अखेर रसिकांच्या सेवेत रुजू होणार आहे.

चित्रपटाच्या दिग्दर्शनासोबतच ‘डार्लिंग’चं लेखनही समीर आशा पाटील यांनी केलं आहे. या सिनेमात प्रथमेश-रितीका-निखिल यांच्या जोडीला मंगेश कदम, आनंद इंगळे आदी कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. संगीतकार चिनार-महेश या संगीतकार जोडीनं या चित्रपटातील गीतांना स्वरसाज चढवला आहे. खरं तर हा चित्रपट या वर्षाच्या सुरुवातीला प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित करण्याची योजना आखण्यात आली होती, पण लॉकडाऊनच्या सावटानं घात केला. आता मात्र कोरोनाचे ढग दूर झाले आहेत. या चित्रपटाचे रिलिजिंग पार्टनर पिकल एंटरटेनमेंटचे समीर दीक्षित आणि ऋषिकेश भिरंगी असून, वितरणाची जबाबदारीही तेच सांभाळणार आहेत.

हेही वाचा :

Bigg Boss Marathi 3 | ‘बिग बॉस मराठी’च्या घरात असं काय घडलं की, 5 लाखांची बॅग उचलून आविष्कार घराबाहेर जायला तयार झाला?

प्रेमाची आठवण बनून राहणाऱ्या नात्यांना घातलेली बदल्याची आर्त साद, वैभव तत्ववादीच्या ‘ग्रे’ चित्रपटाला प्रेक्षकांची विशेष पसंती!