Amit Deshmukh | नाट्यप्रयोग पुन्हा सुरु करण्याच्या हालचाली, अमित देशमुख रंगकर्मींना भेटणार

नाट्यगृहे (Theater) आणि नाटकाच्या प्रयोगास परवानगी द्यावी, यासाठी 'मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघा’ने राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांची भेट घेतली

Amit Deshmukh | नाट्यप्रयोग पुन्हा सुरु करण्याच्या हालचाली, अमित देशमुख रंगकर्मींना भेटणार

मुंबई : कोरोना अनलॉक (Unlock) सुरू झाल्यापासून अर्थचक्राला गती मिळावी, यासाठी सुरक्षेची नियमावली तयार करून विविध व्यवसायांना सुरू करण्यास परवानगी दिली गेली आहे. त्यानुसार नाट्यगृहे (Theater) आणि नाटकाच्या प्रयोगास परवानगी द्यावी, यासाठी ‘मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघा’ने राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांची भेट घेतली (Marathi Natya Nirmata Sangha met Amit Deshmukh to Unlock Theatre).

‘मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघा’ने नाट्य व्यवसायाशी संबंधित घटक संस्थाची सहमती घेऊन राज्य शासनाला 15 सप्टेंबर रोजी ‘नमुना Sop’ सादर केला होता. तसेच, नाट्य (Theater) व्यवसायाला आवश्यक उभारी देण्यासाठी सहाय्य व अर्थसहाय्यासाठीचे मागणी पत्र सादर केले होते.

त्या अनुषंगाने, बुधवारी (30 सप्टेंबर) राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी ‘मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघ-मुंबई’च्या पदाधिकाऱ्यांना बैठकीसाठी मंत्रालय कार्यालयात बोलावले होते. या बैठकीत ‘नाट्य निर्माता संघ’चे अध्यक्ष संतोष काणेकर, उपाध्यक्ष ज्ञानेश महाराव, प्रमुख कार्यवाह राहुल भंडारे आणि ‘अ.भा.मराठी नाट्य परिषद’चे अध्यक्ष प्रसाद कांबळी उपस्थित होते. सांस्कृतिक कार्य विभागाचे मुख्य सचिव सौरभ विजयही यावेळी उपस्थित होते. (Marathi Natya Nirmata Sangha met Amit Deshmukh to Unlock Theatre)

अध्यक्ष संतोष काणेकर यांनी ‘नाट्य निर्माता संघा’चे ‘नमुना-SOP’चे निवेदन व अर्थसहाय्य मागणी पत्र सांस्कृतिक कार्य मंत्री अमितजी देशमुख यांना सादर केले. ते वाचून ‘या दोन्ही बाबत शासन सकारात्मक विचार करेल, अन्य विभागांशी चर्चा करून निर्णय घेईल,’ असे आश्वासन अमित देशमुख यांनी दिले.

शासकीय नियमावली तयार करणार

‘नमुना-SOP’तील मुद्दे लक्षात घेऊन, सांस्कृतिक कार्य सचिवांना ‘शासकीय SOP’ तयार करण्याचे सुरू करण्याची सूचना अमित देशमुख यांनी दिली.

‘शासकीय SOP’ तयार करताना ‘मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघ-मुंबई’ आणि ‘अ.भा.मराठी नाट्य परिषद’ यांचा सहभाग राहील. त्यासाठी लवकरच बैठक बोलण्यात येईल,असे त्यांनी सांगितले. (Marathi Natya Nirmata Sangha met Amit Deshmukh to Unlock Theatre)

अमित देशमुख घेणार नाट्यगृह रंगकर्मींची भेट

नाट्य कलावंत संघ, रंगमच कामगार संघटना, नाट्य व्यवस्थापक संघ या घटक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांबरोबरची बैठक कोरोना-सुरक्षा व्यवस्थेच्या सोयीसाठी ‘यशवंतराव चव्हाण नाट्यगृह’मध्ये व्हावी, अशी विनंती प्रसाद कांबळी यांनी केली. याला मंजुरी देत, 15 दिवसात बैठक घेण्याचे आश्वासन अमित देशमुख यांनी दिले आहे.

सोशल मीडियातील अफवांमुळे कलाकारांची दिशाभूल

शासकीय पातळीवर कोणताही निर्णय झाला नसताना, नाट्यगृह व नाट्य प्रयोग सुरू होत असल्याच्या जाहिराती मिडिया व सोशल मीडियातून केल्या जात आहेत. यातून कलावंत व रंगमंच कामगार यांची दिशाभूल केली जाते. कलावंतांच्या भावनेशी खेळल्या जाणाऱ्या खेळाला अटकाव करणारी भूमिका आपण जाहीर करावी, अशी विनंती संतोष काणेकर यांनी केली. या प्रकाराबाबत मंत्री अमित देशमुख यांनी नाराजी व्यक्त करून, आपली भूमिका लवकरच जाहीर करू, असे आश्वासन दिले.

त्याचबरोबर ‘अनुदान पात्र’ नाटकांचे रखडलेले धनादेश लवकरात लवकर देण्यात यावेत, अशी विनंती राहुल भंडारे यांनी केली. त्या संदर्भातही काम सुरू असल्याचे, मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

(Marathi Natya Nirmata Sangha met Amit Deshmukh to Unlock Theatre)

 

संबंधित बातम्या :

Unlock 5 | मुंबईच्या डबेवाल्यांसाठी खुशखबर, अखेर लोकलमधून प्रवासाची परवानगी

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *