Unlock 5 | मुंबईच्या डबेवाल्यांसाठी खुशखबर, अखेर लोकलमधून प्रवासाची परवानगी

मुंबईच्या डबेवाल्यांना अखेर लोकलमधून प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे.

Unlock 5 | मुंबईच्या डबेवाल्यांसाठी खुशखबर, अखेर लोकलमधून प्रवासाची परवानगी

मुंबई : राज्य सरकारने ‘अनलॉक 5′ साठी महत्त्वाच्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत (Dabawala Get Permission To Travel By Local). त्यामध्ये मुंबईच्या डबेवाल्यांना अखेर लोकलमधून प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईच्या डबेवाल्यांना दिलासा मिळाला आहे (Dabawala Get Permission To Travel By Local).

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट, लॉकल सेवा बंद होत्या. मात्र, अनलॉकच्या दिशेने पावले टाकत असताना आता 5 ऑक्टोबरपासून राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेने सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तर सिनेमा हॉल, स्वीमिंग पूल, मनोरंजन पार्कस, थिएटर सभागृहे 31 ऑक्टोबरपर्यंत बंदच राहणार आहेत. त्याशिवाय, मुंबईच्या डबेवाल्यांना लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

मात्र, लोकलमधून प्रवास करण्यासाठी डबेवाल्यांना मुंबई पोलिसांनी दिलेला क्युआर कोड असणे बंधनकारक असणार आहे. तरच एमएमआरमध्ये लोकलमध्ये डबेवाल्यांना प्रवेश मिळणार आहे.

“आम्ही राज्य सरकारचे आभार मानतो. आम्ही सर्व सोशल डिस्टन्सच्या नियमांचं पालन करुन प्रवास करु. डबेवाला आता पुन्हा कामावर रुजू होणार आहे. त्यासाठी आम्ही पुन्हा एकदा राज्य सरकारचे आभार मानतो”, अशी प्रतिक्रिया मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी दिली (Dabawala Get Permission To Travel By Local).

अनलॉक 5 मध्ये काय सुरु?

 • 5 ऑक्टोबरपासून राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेने सुरु करण्याचा निर्णय
 • राज्यांतर्गत लांब पल्ल्याच्या रेल्वे सेवा सुरु
 • अत्यावश्यक वस्तूंच्या कारखान्याशिवाय अन्य उत्पादनाचे उद्योग सुरु करण्यास परवानगी
 • ऑक्सिजन निर्मिती आणि वाहतुकीवर निर्बंध नाही
 • मुंबईच्या डब्बेवाल्यांना लोकलमधून प्रवासाची परवानगी
 • पुणे विभागातील लोकल ट्रेन सुरू करण्याचा निर्णय
 • मुंबई महानगर प्रदेश MMR मधील लोकल फेऱ्या वाढवण्यास परवानगी

अनलॉक 5 मध्ये काय बंद?

 • सिनेमा हॉल, स्वीमिंग पूल, मनोरंजन पार्कस, थिएटर सभागृहे 31 ऑक्टोबरपर्यंत बंद
 • शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस बंद
 • मेट्रो वाहतूक देखील ऑक्टोबर महिन्यात सुरू होणार नाही
 • सामाजिक, राजकीय कार्यक्रम, खेळाच्या स्पर्धा तसेच मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी

Dabawala Get Permission To Travel By Local

संबंधित बातम्या :

वात पेटली आहे, भडका होऊ शकतो, डबेवाले राज ठाकरेंना भेटले

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *