AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिनेत्यासोबत लग्न, सहन केला शारीरिक छळ अन् विश्वासघात; मराठी अभिनेत्री म्हणाली, सहा महिन्यातच…

Mayuri Wagh On Marriage : मराठी अभिनेत्री मयुरी वाघनं एका मुलाखतीत तिच्या लग्नाबद्दल भाष्य केलं आहे. अभिनेत्रीला या लग्नात खूप त्रास सहन करावा लागलेला.

अभिनेत्यासोबत लग्न, सहन केला शारीरिक छळ अन् विश्वासघात; मराठी अभिनेत्री म्हणाली, सहा महिन्यातच...
| Updated on: Nov 02, 2026 | 6:10 PM
Share

मराठी मनोरंजनविश्वात आपल्या अभिनयानं वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री मयुरी वाघला ‘अस्मिता’ या मालिकेमुळे ओळख मिळाली. याच मालिकेच्या सेटवर तिची अभिनेता पियुष रानडे याच्याशी ओळख झाली आणि त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. पुढे दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांचं वैवाहिक नातं फार काळ टिकू शकलं नाही. अनेक वर्षांनंतर मयुरीनं आपल्या घटस्फोटाबद्दल आणि त्या काळात आलेल्या कठीण अनुभवांबद्दल मनमोकळेपणानं भाष्य केलं.

मयुरीनं सांगितला कठीण काळ

सौमित्र पोटे यांच्या ‘मित्र म्हणे’ या युट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत मयुरी म्हणालेली की, लग्नाचा निर्णय घेताना आपण फारसा विचार केला नव्हता. मयुरी म्हणालेली की, ‘मला कुठल्याच गोष्टीचा पश्चाताप नाही. पण, मी लग्नाचा निर्णय खूपच पटकन घेतला. आताची जनरेशन मी बघतेय की, लोक खूप विचार करून लग्न करतात. जे मी नाही केलं. मी बघितलंय की मुलींचही ठरलेलं असतं की एवढा पगार असलेला मुलगा पाहिजे. त्याचं घर पाहिजे किंवा त्याच्या कुटुंबात या गोष्टी हव्यात. या बाबतीत मुलं किंवा मुली दोघांचेही विचार ठरलेले आहेत. माझं तसं नाही झालं. मी खूप घाई गडबडीत निर्णय घेतला. नेहमीप्रमाणे माझ्या पालकांनी मला पाठिंबा दिला. सहा महिन्यांतच कळलं की निर्णय चुकला आहे. पण, ते मला ते स्वीकारायला खूप वेळ गेला.’

याच मुलाखतीत अभिनेत्रीला तुझा या लग्नात शारीरिक छळ झाला आहे का? असं विचारलं असता अभिनेत्रीनं होकार दिला. मयुरी म्हणाली की, ‘पुढे जावं की थांबावं की आहे तसं सोडून द्यावं हे माझं मलाच कळत नव्हतं. नशिबानं तेव्हा मी शूटिंग करत होते. त्यामुळे जरा माझं डोकं शांत होतं. कारण मला हे पटतच नव्हतं की माझ्यासोबत हे घडू शकतं. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण मी रात्री अडीच वाजता मशीन लावायचे. रात्री किचनमधून सगळी भांडी काढून साफ करायचे. मी खूप एकटी असायचे कुणीच नसायचं. मी घरात मासे आणून ठेवलेले आणि मी त्यांच्याशी बोलायचे. मला कोणासोबत तरी या गोष्टी शेअर करायच्या होत्या. तेव्हा हे मित्र होते. पण, त्यांच्याशी हे मी बोलू शकत नव्हते.’

‘ज्याच्यावर मी १०० टक्के विश्वास ठेवला, काही गोष्टी माझ्या कानावर येत होत्या त्याकडे मी दुर्लक्ष केलंय. पण त्या व्यक्तीकडून विश्वासघात झाला.’ असंही मयुरी म्हणालेली.

Follow Us
उद्धव ठाकरेंना रेजीम चेंजचा अर्थ माहिती आहे की नाही? ठाकरेंना टोला....
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना रेजीम चेंजचा अर्थ माहिती आहे की नाही? ठाकरेंना टोला लगावत नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?
शरद पवारांची प्रकृती बिघडली, रुबी रुग्णालयात दाखल; पुढील दोन दिवस....
Sharad Pawar : शरद पवारांची प्रकृती बिघडली, रुबी रुग्णालयात दाखल; पुढील दोन दिवस पूर्ण विश्रांतीचा सल्ला
तेलंगाणातून काँग्रेसला उखडून फेकणार; हैदराबादच्या रॅलीत अमित शाह...
Amit Shah : तेलंगाणातून काँग्रेसला उखडून फेकणार; हैदराबादच्या रॅलीत अमित शाहांचा निर्धार
सांगलीत सुनेच्या त्रासाला कंटाळून सासऱ्यानं जीवन संपवल
Sangali : सांगलीत सुनेच्या त्रासाला कंटाळून सासऱ्यानं जीवन संपवलं
दिया मिर्झाच्या दिवाळी व्हिडीओवरून मुंबई महापालिकेत भाजप-शिवसेनेत.....
Sanjay Ghadi On BJP : दिया मिर्झाच्या दिवाळी व्हिडीओवरून मुंबई महापालिकेत भाजप-शिवसेनेत मतभेद
दिया मिर्झाने हिंदूंना दिवाळी कशी साजरी करावी हे शिकवू नये...
Ritu Tawde on Dia Mirza : दिया मिर्झाने हिंदूंना दिवाळी कशी साजरी करावी हे शिकवू नये; दिया मिर्झाच्या त्या व्हिडीओवरून महापौर आक्रमक
माझ्याकडे सर्वांचा सातबारा आहे...; रवींद्र धंगेकरांचा रोख कोणाकडे?
Ravindra Dhangekar : माझ्याकडे सर्वांचा सातबारा आहे...; रवींद्र धंगेकरांचा रोख नेमका कोणाकडे?
गोकुळ अध्यक्ष निवडीचा मार्ग मोकळा! कोर्टाचे आदेश काय? 25 संचालकांची...
गोकुळ अध्यक्ष निवडीचा मार्ग मोकळा! कोर्टाचे आदेश काय? 25 संचालकांची महत्त्वपूर्ण सभा अन्...
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; 5 हजारांची अग्रिम मदत खात्यात....
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; 5 हजारांची अग्रिम मदत खात्यात जमा होण्यास सुरुवात
वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड पुन्हा चर्चेत; कमरेला....
Walmik Karad : वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड पुन्हा चर्चेत; कमरेला पिस्तूल लावलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल