रसिका सुनील लग्नाच्या 5 वर्षांनंतरही नवऱ्यापासून राहते दूर, कारण अखेर समोर

'माझ्या नवऱ्याची बायको' फेम रसिका सुनील लग्नाच्या 5 वर्षांनंतर देखील नवऱ्यापासून राहते दूर... कारण अखेर समोर आलंच.... सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा...

रसिका सुनील लग्नाच्या 5 वर्षांनंतरही नवऱ्यापासून राहते दूर, कारण अखेर समोर
Rasika sunil
| Updated on: Jun 18, 2026 | 3:03 PM

‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम रसिका सुनील हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेत विरोधी भूमिका साकारत अभिनेत्रीने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण सध्या रसिका छोड्य पडद्यापासून आहे. मात्र ती रंगभूमी गाजवत आहे. ‘दमदार’ या नाटकातून अभिनेत्री चाहत्यांचं मनोरंजन करत आहे. रसिका फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. रसिका हिने 2021 मध्ये बॉयफ्रेंड आदित्य बिलागी याच्यासोबत मोठ्या थाटात लग्न केलं. दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. सोशल मीडियावर लग्नाचे फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली.

आदित्य बिलागी आणि रसिका सुनील यांच्या लग्नाला आता पाच वर्ष पूर्ण झाली आहे. पण दोघे एकत्र राहत नाही. घटस्फोट न घेता रसिका आणि आदित्य एकमेकांपासून दूर राहतात. सांगायचं झालं तर, लग्नानंतर दोघांनी लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतलेला. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत रसिका लाँग डिस्टन्स मॅरेजबद्दल म्हणाली, ‘आता आम्हाला लाँग डिस्टन्स रिलेशनशिपची सवय झाली आहे. आता असं टेन्शन आहे की, तो इकडे आल्यानंतर एकत्र राहण्यासाठी किती आणि कोणत्या अडचणी येणार आहेत.’

‘आमची फ्रेंडशिप, रिलेशनशिप आणि लग्न देखील सर्वकाही लाँग डिस्टन्स होतं. त्यामुळे आम्हाला त्याची सवय होती आणि एकमेकांबद्दल आम्ही दोघेही सिक्यूअर आहोत… आमच्या नात्यात कुठेच ग्रे एरिया नाहीये आणि ही खूप चांगली गोष्ट आहे. जेव्हा आम्हाला एकमेकांची काळजी वाटते, तेव्हा आम्ही एकमेकांसोबत असतो. मग तेव्हा आम्ही दोघेही कोणतंही कारण सांगत नाही. आम्ही सतत व्हिडीओ कॉलवर बोलत असतो… तो सकाळी उठल्यापासून मी रात्री झोपेपर्यंत… वेळेचं जे काही उलटं सुलटं गणित आहे ते होऊनही आम्ही एकमेकांशी खूप बोलत असतो.’

पुढे रसिका म्हणाली, ‘आम्ही खूप चांगले मित्र आहोत त्यामुळे आमच्यासाठी सर्वकाही सोपं होतं.’, मुलाखतीत रसिका हिला, ‘तुमच्यात भांडणं होतात का?’ असा प्रश्न देखील विचारण्यात आलेला, यावर रसिका म्हणाली, ‘मी फार कोणत्या गोष्टीचा ताण घेत नाही. मला वेळच नाही देत.. हा माझ्या भांडणाचा विषय कधीच नसतो.. मला माझी स्वतःची स्पेस प्रचंड आवडते. त्यामुळे मुद्दा निघालाच तर, तो त्याच्याकडून निघतो, माझ्याकडून नाही. आम्ही दोघे एकमेकांवर डोळे बंद करुन विश्वास ठेवतो. त्यामुळे आमच्यात कोणत्या अडचणी येतच नाहीत…’, असं देखील रसिका म्हणाली.

Follow Us