पाकिस्तानची अनुष्का शर्मा, बाबर आझमशी तिच्या लग्नाच्या चर्चांना उधाण; कोण आहे ही अभिनेत्री?

विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या चेहऱ्यावर त्या दोघांचे चेहरे एडिट करून डीप फेक व्हिडीओ व्हायरल करण्यात आला होता. त्यानंतर चाहते तिला पाकिस्तानची अनुष्का शर्माच म्हणू लागले आहेत. पाकिस्तानी कॅप्टन बाबर आझमसोबत तिच्या अफेअरच्या चर्चा रंगत आहेत.

पाकिस्तानची अनुष्का शर्मा, बाबर आझमशी तिच्या लग्नाच्या चर्चांना उधाण; कोण आहे ही अभिनेत्री?
बाबर आझम, हानिया आमिर
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 16, 2023 | 10:49 AM

मुंबई : 16 नोव्हेंबर 2023 | हानिया आमिर.. हे नाव भारतात जरी तितकं प्रसिद्ध नसलं तरी भारताच्या सीमेपार तिची प्रचंड क्रेझ पहायला मिळते. आधी इंटरनेट सेन्सेशन आणि त्यानंतर अभिनेत्री बनलेली ही सौंदर्यवती पाकिस्तानी कलाविश्वातील लोकप्रिय चेहरा आहे. मात्र सध्या हानिया एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. वर्ल्ड कपदरम्यान हानिया आमिरच्या काही चाहत्यांनी अशी अफवा पसरवली की ती पाकिस्तानी क्रिकेट टीमचा कर्णधार बाबर आझमला डेट करतेय. इतकंच नव्हे तर काहींनी दोघांचे फोटो आणि व्हिडीओ एडिट करून सोशल मीडियावर व्हायरल केले होते. यावर अद्याप हानिया आणि बाबर आझम या दोघांनीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

हानिया आमिर आणि बाबर आझमचं कनेक्शन

हानिया आणि बाबर आझम यांच्या डेटिंगच्या चर्चांना सुरुवात झाली ती म्हणजे दोघांनी एकमेकांचं कौतुक केल्यामुळेच. सोशल मीडियावर हे दोघं एकमेकांची स्तुती करताना दिसले. सोशल मीडियावर कौतुक करणं जरी सर्वसामान्य असलं तरी यादरम्यान एक एडिट लिंक व्हायरल झाली. त्यावरून हानिया आमिर आणि बाबर आझम यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं. या क्लिपमध्ये हानिया आमिर ही बाबर आझमला स्वत:पेक्षा जास्त क्युट असल्याचं म्हणताना दिसतेय. तर बाबर आझम तिच्यासोबत एखाद्या चित्रपटात काम करण्याची इच्छा व्यक्त करत आहे.

अनुष्का शर्माशी तुलना

हानिया फक्त बाबर आझमशी अफेअरच्या चर्चांमुळेच प्रकाशझोतात आली नाही. तर चाहते तिची तुलना बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माशीही करू लागले आहेत. विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांच्या फोटोंवर दोघांचे चेहरे लावून एक डीप फेक व्हिडीओसुद्धा व्हायरल झाला आहे. त्यानंतर चाहते आपल्याच पद्धतीने दोघांच्या प्रेमाची कहाणी विणत आहेत. इतकंच नव्हे तर चाहते हानिया आमिरला पाकिस्तानची अनुष्का शर्मा असंही म्हणत आहेत. कारण विराट कोहली हा टीम इंडियाचा कर्णधार होता आणि बाबर आझम हा सध्या पाकिस्तानी क्रिकेट टीमचा कर्णधार आहे.