AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाबर आझमचा कर्णधारपदाचा तडकाफडकी राजीनामा, पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप

Babar Azam Captaincy Resign : पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठा भूकंप झाला असून बाबर आझम याने संघाचं कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. पोस्ट करत याबाबत माहिती दिली असून आता संघाच्या नेतृत्त्वाची धुरा कोणाकडे दिली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बाबर आझमचा कर्णधारपदाचा तडकाफडकी राजीनामा, पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप
| Updated on: Nov 15, 2023 | 7:54 PM
Share

मुंबई : वर्ल्ड कप 2023 सुरू असताना पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठा भूकंप झाला आहे. पाकिस्तान संघाचा खेळाडू बाबर आझम याने क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान संघ सेमी फायनलमध्ये जागा मिळवू शकली नव्हता. लीग स्टेजच्या नऊ सामन्यांमधील चार सामन्यातच पाकिस्तान संघाने विजय मिळवता आला होता. सुमार कामगिरीनंतर बाबरवर गेले काही दिवस टीका होत होती. अशातच बाबरने तडकाफडकी कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा विक्रम घेतला आहे.

बाबर आझम याने सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. वर्ल्ड कपमधून बाहेर झाल्यावर त्याच्यावर आजी-माजी खेळाडूंनी टीका केली होती. भारतामध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान संघाने खराब कमगिरी केली होती. अफगाणिस्तान संघाने त्यांना पराभूत केलं होतं, क्रिकट बोर्डातही सर्व काही आलबेल नसल्याची माहिती समजत आहे.

मला ती काळ आठवतो 2019 मध्ये पाकिस्तान संघाचं नेतृत्त्व करण्यासाठी फोन आला होता. गेल्या चार वर्षांमध्ये मैदानात आणि बाहेर अनके चढ उतार पाहिले आहेत. मी मनापासून पूर्ण समर्पण करत पाकिस्तानचा क्रिकेट जगतामध्ये नाव होईल हे ध्येय ठेवलं होतं.

व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये पहिल्या स्थानी पोहोचण्यात खेळाडू प्रशिक्षक आणि संघ व्यवस्थापन सर्वांनी सामूहिक प्रयत्न केले. या प्रवासामध्ये चाहत्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांंचे आभार. आज मी तिन्ही फॉरमॅटमधील पाकिस्तानी संघाचे कर्णधारपद सोडत आहे. हा एक कठीण निर्णय आहे पण मला वाटते की हा निर्णय घेण्याची हीच योग्य वेळ आहे. मी तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळाडू म्हणून पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करत राहिल. मला ही महत्त्वाची जबाबदारी दिल्याबद्दल पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचेही मनापासूवन आभार, अशी भावनिक पोस्ट बाबर आझमने केली आहे.

दरम्यान, आताच गेल्या काही दिवसांआधी पाकिस्तान संघाचे प्रशिक्षक मोर्ने मॉर्केल यानेही आपल्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता.  त्या पाठोपाठ आता बाबर आझमने आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्याने आता पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठा भूकंप झाला आहे.

तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.